घरमहाराष्ट्रअलिबागमधील सेक्स रॅकेटमधील कोकेनचे धागे नायजेरियापर्यंत !

अलिबागमधील सेक्स रॅकेटमधील कोकेनचे धागे नायजेरियापर्यंत !

Subscribe

चारजणांना केली अटक

अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर व किहीम येथील बंगल्यामधून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमधील आरोपींकडे सापडलेल्या कोकेनचे धागदोरे नायजेरियापर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणी कोकेन विकणार्‍या चार नायजेरियन नागरिकांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 260 ग्रॅम कोकेन जप्त केले असून बाजारात त्याची 13 लाख रुपये किंमत आहे.

ओकोरो ल्यक पॉल, युझोग्बी फडनंड मेलोदी या दोन नायझेरियन आरोपींना याआधी अटक करण्यात आली आहे. कोडीचीन्मा प्रोमिस यूची (38) आणि ओलुवेदर स्ट्रीट लोगस अशी अटक आता करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

28 जून रोजी अलिबागमध्ये किहीम परिसरातील चिराणिका फार्म व कनकेश्वर फाटा परिसरातील सक्सेना फार्म येथे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी राखी नोटानी व रंजिता सिंग ऊर्फ रेणु यांच्याकडून स्थानिक गुन्हे पथकाने 26 ग्रॅम कोकेन जप्त केले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ओकोरो ल्यक पॉल, युझोग्बी फडनंड मेलोदी या दोन नायझेरियन नागरिकांना व हुसैन मुझफफर रझानी, मनिष दौलत टुकरेल, दिपक अर्जुन अगरवाल या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून 50 ग्रॅम कोकेनही जप्त केले होते.

गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या सूचनेनुसार, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ याच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख, पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग व पोलीस कर्मचारी करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -