घरअर्थजगतखात्यात पैसे नाहीत, तरी करता येणार UPI पेमेंट; RBI ची नवी...

खात्यात पैसे नाहीत, तरी करता येणार UPI पेमेंट; RBI ची नवी सुविधा माहितीय का?

Subscribe

RBI लवकरच क्रेडिट लाईन सुविधा UPI मध्ये आणणार आहे. मात्र, यावर अजूनही काम चालू असल्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. RBI ने जर UPI मध्ये क्रेडिट लाईन सुविधा आणली तर त्याचा मोठा फायदा हा सर्वसामान्य लोकांना होणार आहे, याशिवाय बॅंकांनाही या सुविधेचा फायदा होणार असल्याचा विश्वास शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला.

RBI कडून रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. ते जैसे थे ठेवण्यात आले आहेत. याच MPC च्या बैठकीत अजून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे RBI लवकरच क्रेडिट लाईन सुविधा UPI मध्ये आणणार आहे. मात्र, यावर अजूनही काम चालू असल्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. RBI ने जर UPI मध्ये क्रेडिट लाईन सुविधा आणली तर त्याचा मोठा फायदा हा सर्वसामान्य लोकांना होणार आहे, याशिवाय बॅंकांनाही या सुविधेचा फायदा होणार असल्याचा विश्वास शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला. RBI will soon bring credit line facility to UPI RBI Governor Shaktikanta Das has said that the work is still going on

Rupay Credit Card ला UPI शी जोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता तुम्ही क्रेडिट लाईनचा वापर करुन खात्यावर पैसे नसतील तरीसुद्धा पेमेंट करु शकणार आहात. तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमच्या खात्यातून ती रक्कम वजा होईल. ती सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्डसारखंचं इथेही व्याज भरावे लागणार आहे. मात्र, ते किती आणि कशास्वरुपाचे असेल याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

- Advertisement -

ग्राहक त्यांच्या बॅंक खात्यातून UPI द्वारे पैसे देतात. काही अॅप्स आधीच ही रक्कम वाॅलेटमध्ये ट्रान्सफर करण्याची सुविधा देतात. हे पेमेंटदेखील केवळ बॅंक ठेवीद्वारे केले जाते. RBI च्या या प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर, ग्राहक त्यांच्या ठेवींमधून तसेच पूर्व- मंजूर क्रेडिट्समधून UPI पेमेंट करु शकतील.

( हेही वाचा: PAN-Aadhar Link: 30 जूनपर्यंत पॅन-आधारशी लिंक केलं नाही तर भरावा लागेल दंड, ‘या’ सेवाही होणार बंद )

- Advertisement -

बॅंक खात्यावरील डिपाॅझिटवर शक्तिकांत दास यांची मोठी घोषणा

UPI नेटवर्कद्वारे, ग्राहक पेमेंटसाठी बॅंकांनी दिलेले क्रेडिट देखील वापरु शकतील. थोडक्यात क्रेडिट कार्डसारखी ही सुविधा असणार आहे. तुम्ही आधी पेमेंट करायचं आणि नंतर बॅंक खात्यावरुन पैसे वजा केले जाणार आहेत.

डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर म्हणाले की, यामुळे क्रेडिट कार्डची संख्या कमी करुन लोकांना UPI द्वारे व्यवहार करण्याची संधी मिळेल. UPI द्वारे ग्राहक बॅंकेच्या क्रेडिट लाईनचा वापर करु शकतील. क्रेडिट लाइन ग्राहकाच्या बॅंक खात्याशी लिंक केली जाईल आणि आता खरेदी करा, नंतर पे शी लिंक केलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -