घरअर्थजगतशेअर बाजारानं टेन्शन वाढवलं, दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी बुडाले, पुढे...

शेअर बाजारानं टेन्शन वाढवलं, दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी बुडाले, पुढे काय?

Subscribe

तज्ज्ञांच्या मते, ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढलीय कारण युरोपातील अनेक देशांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरतोय प्रकरणे आणखी वाढल्यास व्यावसायिक कामे ठप्प होतील. अशा स्थितीत आर्थिक विकासाचे चाक पुन्हा एकदा मंद होईल.

नवी दिल्लीः शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसलाय. ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी विक्री झालीय. या संकेतांचा परिणाम सोमवारी देशांतर्गत बाजारावरही दिसून आला. सेन्सेक्स 1700 अंकांनी तर निफ्टी 550 अंकांनी घसरला. गेल्या दोन सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटींहून अधिक रुपये बुडालेत.

शेअर बाजाराच्या तीन गोष्टींनी वाढवल्या चिंता

>> तज्ज्ञांच्या मते, ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढलीय कारण युरोपातील अनेक देशांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरतोय प्रकरणे आणखी वाढल्यास व्यावसायिक कामे ठप्प होतील. अशा स्थितीत आर्थिक विकासाचे चाक पुन्हा एकदा मंद होईल. नेदरलँड्सने सणासुदीच्या मध्यावर लॉकडाऊन लागू केलाय. यूकेने आधीच प्रवासी निर्बंध लादले होते आणि जर्मनी आणि ऑस्ट्रियासारखे देश त्यांच्या नव्या कोविड लाटेपासून आता कुठे सावरत आहेत.

- Advertisement -

>> यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने महागाईशी लढण्यासाठी 2022 च्या अखेरीस तीनदा व्याजदर वाढवण्याचे संकेत दिलेत. अशा स्थितीत गुंतवणूकदारांची चिंता वाढलीय. फेडरल रिझर्व्हनंतर आता इतर केंद्रीय बँकाही कठोर भूमिका घेऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोविड 19 महामारी सुरू झाल्यापासून बँक ऑफ इंग्लंड गुरुवारी व्याजदर वाढवणारी पहिली प्रमुख केंद्रीय बँक बनली. नॉर्वेने या वर्षी 16 डिसेंबरला कोविड निर्बंधांचा विस्तार करूनही दुसऱ्यांदा दर वाढवले, तर रशियाने 17 डिसेंबरला या वर्षी सातव्यांदा आपले धोरण दर वाढवले. अशा स्थितीत भारतातही दर वाढण्याची शक्यता बळावलीय.

>> जगातील विकसित अर्थव्यवस्थांच्या मध्यवर्ती बँकांनी धोरणे कडक केल्यामुळे भारताच्या बाजारपेठा यापुढे तितक्या फायद्यात राहणार नाहीत. त्यामुळे जगभरातील मोठे गुंतवणूकदार आता भारताच्या शेअर बाजारातून पैसे काढू लागलेत. केवळ डिसेंबर महिन्यातच विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून 26,000 कोटी रुपये काढून घेतलेत.

- Advertisement -

गुंतवणूकदारांनी आता काय करावे?

शेअर बाजाराची नजर बहुतांशी बँकिंग शेअर्सवर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बँकिंग स्टॉक्स अल्पावधीत बाजाराची दिशा ठरवतील. गेल्या आठवड्यात आयटी कंपन्यांचे समभाग वगळता सर्वच क्षेत्रांत जोरदार विक्री झाली. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी चांगल्या फंडामेंटल्स असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सवर सट्टा लावावा. मोठ्या ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनेलने Nykaa चा स्टॉक खरेदीचा सल्ला दिलाय. शेअरचे लक्ष्य 2183 रुपये निश्चित करण्यात आलेय. सध्याच्या शेअरच्या किमतीवर रिस्क रिवॉर्ड शिल्लक असताना कंपनीच्या व्यवसायावर तो उत्साही आहे. याशिवाय ब्रोकरेज नोमुराने सिप्ला कंपनीच्या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिलाय. शेअरचे लक्ष्य 1051 रुपये ठेवण्यात आलेय. इंजेक्शन करण्यायोग्य लॅनरिओटाइड डेपोला यूएस नियामक यूएस एफडीएकडून मंजुरी मिळालीय. आता कंपनी लवकरच Lanreotide injection लाँच करू शकते. Lanreotide इंजेक्शनला पुढील मान्यता कंपनीसाठी सकारात्मक ठरेल. त्यामुळे कंपनीचे उत्पन्न वाढेल.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -