घरताज्या घडामोडीTET EXAM: परीक्षांमधील घोटाळ्याची चौकशी सीबीआयच्या मार्फत करा, फडणवीसांची मागणी

TET EXAM: परीक्षांमधील घोटाळ्याची चौकशी सीबीआयच्या मार्फत करा, फडणवीसांची मागणी

Subscribe

म्हाडाच्या परीक्षांचे पेपर लीक झाल्याप्रकरणी जीए सॉफ्टवेअरचे संचालक प्रीतिश देशमुख यांच्याघरी टीईटी आणि आरोग्य भरतीच्या परीक्षांचेही ओळखपत्र सापडले आहेत. या प्रकऱणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे पहिले ८८ लाख आणि नंतर पुन्हा सोने, २ कोटी रुपये सापडले आहेत. विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्यातील परीक्षा घोटाळ्यांमध्ये धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या अटकेनंतर अनेक खुलासे झाले आहेत. परीक्षांच्या घोटाळ्यात प्रत्येकी २ कोटी रुपयांची लाच घेण्यात आली असल्याचे समोर आले आहे. यानंतर सुपेंच्या घरी ८८ लाख रुपये सापडल्यानंतर पुन्हा २ कोटी रुपये आणि सोने सापडले आहे. सुपेंच्या घरी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत परीक्षा घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेंकडे ८८ लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी २ कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच ३ महिन्यात बाहेर काढले. आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलीस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा :  फडणवीसांनी ७ वर्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला, नवाब मलिकांचा आरोप


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -