घरअर्थजगतबँकांप्रमाणेच LICमध्येही 'इतकी' रक्कम पडून

बँकांप्रमाणेच LICमध्येही ‘इतकी’ रक्कम पडून

Subscribe

एलआयसी धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) देखील १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सुमारे ३५,००० कोटी रुपयांचे वारस शोधण्यासाठी एक नवीन केंद्रीकृत पोर्टल तयार करण्याची घोषणा केली.

एलआयसी धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) देखील १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सुमारे ३५,००० कोटी रुपयांचे वारस शोधण्यासाठी एक नवीन केंद्रीकृत पोर्टल तयार करण्याची घोषणा केली. मात्र, याबाबत सरकारी विमा कंपनी ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ही मागे नाही. LIC कडेही जवळपास २१ हजार ५०० कोटी रुपये आहेत, ज्याच्यावर कोणीतही दावा केलेला नाही. (unclaimed amount in LIC 21500 crore)

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या माहितीनुसार, अंदाजे २१५०० कोटी रुपये विनादावेदार पडून आहेत. एलआयसीने जेंव्हा आपला आयपीओ आणला होता तेंव्हा ही माहिती देण्यात आली होती. एलआयसीकडे सप्टेंबर २०२१ पर्यंत २१,५३९ कोटी रुपयांचा दावा न केलेला निधी होता.

- Advertisement -

अनक्लेम अमाऊंट म्हणजे काय

१० वर्षांच्या कालावधीनंतरही विमा कंपनीकडे दावा न केलेली कोणतीही रक्कम दावा न केलेली रक्कम म्हणतात. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (इर्डा) नियमांनुसार, विमा कंपन्यांना १००० रुपये किंवा त्याहून अधिक रकमेची माहिती अद्ययावत ठेवावी लागते. बरेच लोक बँकांसह एलआयसीच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात, परंतु काही कारणांमुळे ती मध्यावर मोडावी लागते अथवा मॅच्युरिटीवर पैसे काढायला विसरतात, मग त्याला दावा न केलेली रक्कम म्हणतात आणि ती कंपनीकडे सुरक्षित राहते.

- Advertisement -

दावा न केलेली रक्कम शोधण्यासाठी प्रक्रिया

पॉलिसी धारकांच्या दावा न केलेल्या रकमेची माहिती देण्यासाठी एलआयसीने त्यांच्या पोर्टलवर एक विशेष साधन दिले आहे. येथे तुम्ही पॉलिसी क्रमांकासह आवश्यक माहिती देऊन दावा न केलेल्या रकमेबद्दल जाणून घेऊ शकतात.

असा करा दावा

  • एलआयसीच्या संकेतस्थळावर जाऊन अनक्लेम्ड पॉलीसी ड्यूज पर्यायायवर क्लिक करा.
  • लिक ओपन होताच पॉलीसी नंबर, पॉलीसी धारकाचे नाव, जन्मतारीख, पॅनकार्डचे डिटेल्स टाका.
  • ही माहिती टाकल्यानंतर, तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करताच, पॉलिसीशी संबंधित दावा न केलेल्या रकमेची माहिती तुमच्यासमोर येईल.

हेही वाचा – शिवसेना भवन ताब्यात घेण्याच्या याचिकेबाबत नरेश म्हस्केंकडून खुलासा, म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -