चित्रपट पाहायला 300 रुपये न दिल्याने 11 वर्षीय चिमुकल्याने गळफास घेऊन संपवले जीवन

नवदीप हा दक्षिणात्या सुपरस्टार अभिनेता पवन कल्याणचा मोठा चाहता होता. त्यामुळे नवदीप आणि त्याच्या मित्रांना पवन कल्याणचा आगामी भीमला नायक हा चित्रपट एकत्र पाहण्याचा प्लॅन केला होता. यासाठी नवदीपच्या सर्व मित्रांनी चित्रपट रिलीजच्या आधी आगाऊ तिकीट बुक केले होते.

another kolkata model found dead fourth in 2 weeks marathi
कोलकत्यात आणखी एक मॉडेलची गळफास घेत आत्महत्या; दोन आठवड्यात चौथ्या मॉडेलचा मृत्यू

घरच्यांनी चित्रपट पाहण्यासाठी 300 रुपये न दिल्याने तेलंगणामध्ये एका 11 वर्षीय चिमकल्याने गळफास घेऊन आपले जीवन संपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाला आपल्या मित्रांसोबत चित्रपट पाहण्यासाठी जायचे होते. सर्व मित्र जात असताना त्यानेही घरच्यांकडे पैशांसाठी आग्रह केला. मात्र आई-वडीलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तेलंगणातील हैदराबाद येथे घडली आहे. नारायण यांचा मुलगा नवदीप हा आठवीच्या वर्गात शिकत होता. नवदीप हा दक्षिणात्या सुपरस्टार अभिनेता पवन कल्याणचा मोठा चाहता होता. त्यामुळे नवदीप आणि त्याच्या मित्रांना पवन कल्याणचा आगामी भीमला नायक हा चित्रपट एकत्र पाहण्याचा प्लॅन केला होता. यासाठी नवदीपच्या सर्व मित्रांनी चित्रपट रिलीजच्या आधी आगाऊ तिकीट बुक केले होते.

यावेळी नवदीपनेही सोमवारी रात्री आगाऊ तिकीट बुक करण्यासाठी आई-वडीलांकडे 300  पैशांची मागणी केली. मात्र वडीलांनी पैसे देण्यास नकार दिला. पैसे न मिळाल्याने रागाच्या भरात नवदीपने घराच्या बाल्कनीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरु आहे.

साऊथ इंडियन सुपरस्टार पवन कल्याणचा आगामी अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपट भीमला नायक 25 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाने रिलीज पूर्वीच 100 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.


Facebook च्या कर्मचाऱ्यांना मिळणार नवी ओळख, मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले या मागचे कारण