Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम लातूरमध्ये हत्या करुन पळालेल्या आरोपीला भिवंडीत अटक

लातूरमध्ये हत्या करुन पळालेल्या आरोपीला भिवंडीत अटक

Related Story

- Advertisement -

लातूर येथे चोरी आणि खुनाचा गुन्हा दाखल असलेला आरोपी भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार या भागात लपून बसल्याची माहिती स्थानिक निजामपुरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोहसीन अब्दुल हसिफ शेख उर्फ बाबा पठाण असे आरोपीचे नाव आहे.

निजामपुरा पोलीस ठाणे हद्दीतील एकता चौक फैजान अपार्टमेंट, खाडीपार येथे आपली ओळख लपवून राहिला असल्याची माहिती निजामपुरा पोलीस ठाणे पोलीस शिपाई निळकंठ खडके यांना प्राप्त झाली होती. त्यांनी याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांना कळवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सापळा रचून कारवाई केली.

- Advertisement -

आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी तपास पथक अधिकारी, अंमलदार तसेच गोपनीय अंमलदार यांनी सापळा रचून सदर आरोपीला सुपर गार्डन हॉटेल, एकता चौक, खाडीपार भिवंडी येथून ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने लातूर जिल्ह्यात एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खून तसेच औसा पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचे गुन्हे केले असल्याचे कबूल केले. सदर गुन्ह्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील माहिती घेतली असता सदर इसमा विरुद्ध त्याने सांगितल्याप्रमाणे गुन्हे दाखल असल्याची बाब उघड झाली. आरोपी मोहसीन अब्दुल हसिफ शेख उर्फ बाबा पठाण यास पोलीस ठाणे, निजामपुरा, भिवंडी येथे ताब्यात देण्यात आले. तसेच संबंधित पोलीस ठाण्यास कळविण्यात आले आहे.

- Advertisement -