घरमहाराष्ट्रLoksabha 2024: यादीत नाव नाही; हेमंत गोडसे म्हणाले, नाशिकची निवडणूक शेवटच्या...

Loksabha 2024: यादीत नाव नाही; हेमंत गोडसे म्हणाले, नाशिकची निवडणूक शेवटच्या…

Subscribe

नाशिक: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र सर्वांचेच लक्ष असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांचे पहिल्या यादीत नाव नसल्याने नाशिकच्या जागेवरून सस्पेन्स कायम आहे. यावर आता हेमंत गोडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Loksabha 2024 No name in list Hemant Godse said Nashik election last Chhagan Bhujbal)

गोडसे म्हणाले की, दोन-तीन टप्प्यात याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. आम्हाला विश्वास आहे की, दुसऱ्या टप्प्यात आमचे नाव यादीत असेल. तसंच, आमच्या इतरही खासदारांची नावे लवकरच जाहीर होतील, असे त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र सर्वांचेच लक्ष असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांचे पहिल्या यादीत नाव नसल्याने नाशिकच्या जागेवरून सस्पेन्स कायम आहे. यावर आता हेमंत गोडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळदेखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तुम्हाला सोडून त्यांना संधी मिळेल का? अशी विचारणा केली असता हेमंत गोडसे म्हणाले की, महायुतीचे सर्वच नेते यावर चर्चा करुन निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेतील. नाशिकची जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणालाच ही जागा सुटेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

नाशिकची निवडणूक अंतिम टप्प्यात

तुमचं नाव यादीत नाही, यावर हेमंत गोडसे म्हणाले की, नाशिकची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहेत.20 मे रोजी नाशिकची निवडणूक होणार आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि इतर खासदारांची यादी निश्चितच पुढच्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होईल, असंही त्यांनी म्हटलं.

पहिल्या यादीत 8 उमेदवारांची घोषणा झाली. दुसऱ्या यादीत आकडा वाढेल का? यावर हेमंत गोडसे म्हणाले की, हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. आमची मागणी एकूण 18 खासदारांची होती. त्यामुळे त्याच्या जवळपास आम्हाला जागा मिळतील. आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे, असं ते म्हणाले.

(हेही वाचा: Gangster Mukhtar Ansari : आजोबा स्वातंत्र्य सैनिक, काका उपराष्ट्रपती; अशी आहे गँगस्टर मुख्तार अंसारीच्या कुटुंबाची हिस्ट्री)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -