घरक्राइमसासू, सून, अनैतिक संबंध आणि दगड; फिल्मी स्टाईल खूनाचं गुढ पोलिसांनी उकललं

सासू, सून, अनैतिक संबंध आणि दगड; फिल्मी स्टाईल खूनाचं गुढ पोलिसांनी उकललं

Subscribe

सावधान इंडिया या क्राईम मालिकेला नव्या एपिसोडसाठी कथा शोधण्याची धडपड बहुधा करावी लागत नसावी. कारण आपल्या समाजात अनैतिक संबंधामुळे अनेक गुन्हे घडत असतात. पोलीस मोठ्या हुशारीने या गुन्ह्यांचा छडा लावतात. फिल्मी कथेपेक्षा हे गुन्हे काही कमी नसतात. बोरीवली येथील गोराईमध्ये असाच फिल्मी स्टाईलने एक खून करण्यात आला. २४ ऑक्टोबर रोजी ५७ वर्षीय महिलेचा खून झाला होता. वृद्ध महिलेचा खून झाल्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. महिलेच्या कुटुंबियांनी हा खून एखाद्या माथेफिरूने केला असल्याचे सांगितले. घरात असलेल्या एका दगडाने डोके ठेचून सदर महिलेचा खून झाला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करुन सासू, सून, तिचे अनैतिक संबंध आणि घरात असलेला भलामोठा दगड याचे गुढ उकलले.

खून झालेल्या महिलेचे नाव शालूबाई लाखे असे आहे. खुनाच्या दिवशी शालूबाईंनी सून राधा लाखे (वय ३) हीला दीपक माने (वय ३८) या परपुरुषासोबत बाथरुममध्ये नको त्या अवस्थेत पकडले होते. सुनेचे हे प्रताप राधाचा नवरा बाहेर गावावरुन आल्यावर सांगते, अशी धमकी शालूबाईंनी दिली. राधाचा नवरा ड्रायव्हर असून तो कामासाठी नेहमी बाहेरगावी असतो. दिपकशी असलेले आपले अनैतिक संबंध नवऱ्याला कळू नये म्हणून राधा आणि दीपक यांनी शालूबाई यांचा खून करण्याचा कट रचला.

- Advertisement -

सासूचा खून करण्यासाठी राधा लाखे हीने बाहेरून एक मोठा दगड आणून घरात ठेवला. संध्याकाळी गरबा खेळायला जाते असून सांगून राधा घराबाहेर पडली. त्यानंतर दीपक माने याने गुपचूप घरात प्रवेश करत राधाने ठेवलेल्या दगडाने सासूचे डोके ठेचून खून केला.

पोलिसांच्या तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न राधाने केला होता. मात्र कोरोनामुळे कुठेही गरबा खेळण्यास परवानगी नाही, मग राधा बाहेर कशाला गेली होती? असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली. पोलिसांनू सून राधा हीस ताब्यात घेऊन पोलीसांचा खाक्या दाखवताच राधाने सर्व स्टोरी कथन केली. राधानेच तो दगड घरात आणून ठेवला होता, तसेच रात्री बाहेर जाताना दरवाजा उघडा ठेवून जायचे आणि प्रियकर दीपकने येऊन खून करायचे, असे नियोजन ठरल्याचे पोलिसांसमोर सांगून टाकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -