घरक्राइमधक्कादायक! मुंबईतील घरात आढळला मिर्झापूर फेम अभिनेता ब्रह्मा मिश्राचा मृतदेह

धक्कादायक! मुंबईतील घरात आढळला मिर्झापूर फेम अभिनेता ब्रह्मा मिश्राचा मृतदेह

Subscribe

बॉलिवूड अभिनेता ब्रह्मास्वरूप मिश्रा (३६), हा  गुरुवारी दुपारी मुंबईच्या वर्सोवा येथील यारी रोड येथील भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आला. अभिनेता ब्रह्मास्वरूप मिश्रा याने आत्तापर्यंत हसीन दिलरुबा (२०२१), केसरी (२०१९ ) आणि चोर चोर सुपर चोर (२०१३) या चित्रपटात भूमिका केली आहे. याशिवाय मिर्झापूर या सुप्रसिद्ध वेबसीरिजमध्ये त्याने मुन्ना भैय्याच्या मित्राची ललितची भूमिका निभावली होती.

पोलिसांनी सांगितले की, प्रथमदर्शनी अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने नैसर्गिक मृत्यू झाला आहे.  मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला असून भोपाळ येथील त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. ब्रह्मा मिश्रा याच्या मृत्यूमागे कुठलाही संशय नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

- Advertisement -

ब्रह्मा मिश्रा मागील चार वर्षांपासून वर्सोवा येथील फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याला ओळखीच्या लोकांनी शेवटचे बघितल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रह्मा याचा मृतदेह अर्धवट कुजलेला होता. त्याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी डुप्लिकेट चावी वापरून दरवाजा उघडला आणि टॉयलेटमध्ये अभिनेत्याचा मृतदेह आढळला. त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -