घरक्राइमधक्कादायक! लग्नाला नकार दिल्यानं तरुणीला लोकलसमोर ढकललं

धक्कादायक! लग्नाला नकार दिल्यानं तरुणीला लोकलसमोर ढकललं

Subscribe

खार रोड स्थानकातील धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

लग्नाला नकार दिल्याने प्रियसीला धावत्या रेल्वेखाली ढकल्याची धक्कादायक घटना मुंबईतील खार रेल्वे स्थानकात घडली आहे. या घटनेतून तरुणी थोडक्यात बचावली आहे. मात्र तिच्या डोक्याला जब्बर दुखापत झाली असून १२ टाके पडले आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकर सुमेध जाधवला रेल्वे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुंबईतील खार रेल्वे स्थानकात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आरोपी वडाळा येथे राहत असून तो गेली दोन वर्षापासून तरुणीला ओळखतो. दोघे कामावरचे सहकारी असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली. याचदरम्यान तरुणाला दारुचं व्यसन असल्याचे कळल्याने त्याच्यापासून दूर राहणे तरुणीने पसंत केले. मात्र तो तरुणीला त्रास देऊ लागला. तरुणीने याआधीही या आरोपी तरुणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती मात्र तरीही त्रास देणे सुरुचं होते.

यादरम्यान शुक्रवारी सायंकाळी तरुणी अंधेरी स्थानकावरुन खार रोडला जात असताना सुमेधने तिचा पाठलाग सुरु केला. त्यानेही अंधेरी स्थानकवरून लोकल पकडली. यावेळी घाबरलेल्या तरुणीने आईला फोन लावला व घडलेला प्रकार सांगितला. यावेळी तरुणीची आई तिच्या मदतीसाठी रेल्वे स्थानकावर पोहचली. यावेळी तरुणीही खार स्थानकात पोहचली. यावेळी आरोपी सुमेध तिच्या जवळ पोहचला.यावेळी आरोपीने तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला मात्र तरुणीने लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला. दरम्यान लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने दोघांमध्ये वाद सुरु झाले. सुमेधने स्वत:ला संपवण्याची धमकी दिली.तो धावत्या लोकलच्या दिशेने धावला. मात्र, अचानक मागे फिरला. त्याने तरुणीला फरफटत नेत रेल्वे स्थानकात येणाऱ्या धावत्या रेल्वेखाली ठकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीच्या आईने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीत धावत्या लोकलच्या धडकेने तरुणीच्या डोक्याला जब्बर मार लागला. जखमी अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल कण्यात आले. तिच्या डोक्याला १२ टाके पडले असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर आरोपीने तेथून पसार झाला होता. यावेळी पोलिसांच्या विविध पथकांच्या मदताने आरोपीला अवघ्या १२ तासांच्या आत अटक करत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

हेही वाचा- पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन; बाहेर फिरण्यास बंदी

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -