Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम नागपूरातील धक्कादायक घटना! कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

नागपूरातील धक्कादायक घटना! कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

Related Story

- Advertisement -

नागपूरात कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील पाच जणांच्या हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुख आरोपीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अंगावराचा थरकाप उडवणारी ही घटना सोमवारी सकाळी नागपुरच्या पाचपावली भागातून उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील पाचपावली नजीक रंभाजी रोड जवळचं राहणाऱ्या आलोक माथुरकर या कुटुंबप्रमुख आरोपीने आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. यानंतर काही अंतरावर राहणाऱ्या सासू आणि मेहुणीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पुन्हा आपल्या घऱी आला आणि स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेत एकूण सहा जण जागीच मरण पावले आहेत.

- Advertisement -

कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. रविवारी मध्यरात्री आरोपीने या क्रूर हत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या मृतदेहांचा पोलिसांनी पंचनामा केला असून सर्व मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ही हत्या का करण्यात आली आहे या बाबत मारेकरी असलेल्या आलोकने काही पत्र लिहून ठेवले का याचा अधिक तपास पोलिस घेत आहेत.


कोरोना नुकसान भरपाई, मृत्यू दाखल्याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला, केंद्राला दिली तीन दिवसांची मुदत


 

- Advertisement -