घरक्राइमCrime News : पोलीस हवालदाराच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; तरुणाला अटक

Crime News : पोलीस हवालदाराच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; तरुणाला अटक

Subscribe

मुंबई : पोलीस हवालदाराच्या 24 वर्षांच्या मुलीने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी पराग पंकज डाकी या आरोपी तरुणाला भायखळा पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. मृत तरुणीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना काही व्हिडीओ सापडले असून त्यात तिने पराग हाच तिच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले आहे. (Police constable’s daughter commits suicide by hanging Youth arrested )

तक्रारदार पोलीस हवालदार असून सध्या ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रतिनियुक्तीवर आहेत. ते गेल्या सहा वर्षांपासून त्यांची पत्नी आणि दोन मुलींसोबत भायखळा परिसरात राहतात. सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजता त्यांची मोठी मुलगी जान्हवी (नावात बदल) हिने राहत्या घरी सिलिंग फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी जान्हवीचा मोबाईल ताब्यात घेतला होता. त्यात पोलिसांना तिचे काही व्हिडीओ सापडले होते. या व्हिडीओमध्ये ती परागमुळे मानसिक तणावात असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

हेही वाचा – Salman khan : सलमान खानच्या घराजवळील गोळीबाराचा कट बिहारमध्ये शिजला

पराग तिच्यासह तिची बहिण आणि आईविषयी आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामीचा प्रयत्न करत होता. त्याने तिला प्रचंड त्रास दिला असून त्याच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, असेही तिने एका व्हिडीओमध्ये सांगितले आहे. माझ्या आत्महत्येला पराग डाकी हाच जबाबदार असल्याचे तिने नमूद केले होते.

- Advertisement -

पराग हा तक्रारदाराच्या मेहुणीच्या मुलाच्या पत्नीचा भाऊ असून तो भायखळा येथील संत सावता मार्ग, तिसरी क्रॉस लेन, वॉर्डन चाळीत राहतो. त्याच्याकडून होणार्‍या अपमानास्पद आणि आक्षेपार्ह संभाषणामुळे जान्हवीने आत्महत्या केली होती. हा प्रकार तक्रारदाराच्या निदर्शनास येताच त्यांनी भायखळा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी पराग डाकीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.


एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या महिलेसह तिघांना अटक

मुंबई : एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका महिलेसह तिघांना घाटकोपर आणि आझाद मैदान युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी 42 लाख रुपयांचा 210 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपींना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

नागपाडा परिसरात काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती आझाद मैदान युनिटला मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 24 लाख रुपयांचे 120 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

हेही वाचा – भयमुक्त निवडणुकीसाठी मालेगाव, लोणी, चाळीसगावातील १६ गुन्हेगारांवर मोक्का

ही कारवाई सुरू असताना घाटकोपर युनिटच्या अधिकार्‍यांनी अंधेरीतील मरोळ परिसरातून एका महिलेसह दोघांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी 90 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत सुमारे 18 लाख रुपये आहे. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास एपीआय अमोल गवळी आणि राघवेंद्र लोंढे हे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -