घरक्राइमMumbai Crime News : शेअर ट्रेडिंगच्या नावाने संगीत दिग्दर्शकाची फसवणूक; आरोपीला अटक

Mumbai Crime News : शेअर ट्रेडिंगच्या नावाने संगीत दिग्दर्शकाची फसवणूक; आरोपीला अटक

Subscribe

Mumbai Crime News : शेअर ट्रेडिंगच्या नावाने एका संगीत दिग्दर्शकाची साडेचार लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हिमांशू नायक या आरोपीस मध्यप्रदेशातून सायबर सेल पोलिसांनी अटक केली.

मुंबई : शेअर ट्रेडिंगच्या नावाने एका संगीत दिग्दर्शकाची साडेचार लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हिमांशू नायक या आरोपीस मध्यप्रदेशातून सायबर सेल पोलिसांनी अटक केली. हिमांशूने 50 हजार रुपयांच्या कमिशनसाठी सायबर ठगांना बोगस बँक खाते उघडून दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. (Mumbai crime news music director duped in the name of share trading; the accused was arrested)

तक्रारदार हे बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहेत. जानेवारी महिन्यांत त्यांना सोशल मिडीयावर शेअर ट्रेडिंगची एक जाहिरात दिसली होती. ती लिंक ओपन करून शेअर ट्रेडिंगची माहिती जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. यावेळी अज्ञात सायबर ठगांनी त्यांना एका ग्रुपमध्ये ऍड करुन व्हॉट्सऍपवर ट्रेडिंगसंदर्भातील माहिती दिली होती. या माहितीनंतर त्यांनी एका खासगी कंपनीच्या आयपीओमध्ये सुमारे साडेचार लाखांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना सुरुवातीला चांगला फायदा होत झाला. मात्र ही रक्कम त्यांना काढता येत नव्हती. ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता, विविध टॅक्स म्हणून पैसे भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र, यावेळी जागरूक होऊन त्यांनी ही रक्कम न भरता त्याची सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता.

- Advertisement -

तांत्रिक माहितीवरुन या पथकाने मध्यप्रदेशातून हिमांशू नायकला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत ऑनलाईन फसवणूक करणार्‍या सायबर ठगांना मदत करत असल्याचे उघडकीस आले होते. हिमांशु याने ठगांसाठी विविध बँकेत खाते उघडून दिले होते. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत होती. या रक्कमेतून ठराविक रक्कम त्याला कमिशन म्हणून मिळत होती. आतापर्यंत त्याला 50 हजार रुपयांचे कमिशन मिळाले असून या पैशांतून त्याने मौजमजा केल्याचे पोलिसांना सांगितले. (Mumbai crime news music director duped in the name of share trading; the accused was arrested)


शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने वृद्धेची फसवणूक

- Advertisement -

मुंबई : अंधेरीतील एका शिक्षण संस्थेशी संबंधित वृद्ध महिलेची शेअरमार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाने आठ लाख साठ हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सर्वेश श्रीवास्तव असे नाव सांगणार्‍या सायबर ठगाविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या या 60 वर्षीय महिलेच्या मालकीची एक शिक्षण संस्था आहे. फेब्रुवारी महिन्यांत सोशल मिडीयावर तिला शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करुन जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा याबाबतची एक जाहिरात दिसली होती. ती लिंक ओपन केल्यानंतर तिला एका व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले होते. त्यात तिच्याप्रमाणे इतर काही सभासद होते. ग्रुपमध्ये सर्वेश श्रीवास्तव नावाचा एक व्यक्ती शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत प्रशिक्षण देऊन त्यांना काही नोट्स पाठवत होता. त्यानेच शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करुन तिला जास्तीत जास्त परतावा देण्याचे आश्‍वसान दिले होते. या आमिषाला बळी पडून तिने त्याच्या सांगण्यावरुन विविध शेअरमध्ये काही रक्कम गुंतवली. या गुंतवणुकीनंतर तिला त्यात फायदा तर होत होता, पण पैसे काही काढता येत नव्हते. याबाबत तिने विचारणा केल्यानंतर तिला आणखीन काही रक्कम गुंतवणुकीस सांगण्यात आले. मात्र कुठलाही परवाता मिळत नसल्याने तिला संशय आला आणि तिने ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे सर्वेश श्रीवास्रवतविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सर्वेशविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Mumbai crime news elderly lady duped in the name of share trading; the accused was arrested)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -