Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम Ponniyin Selvan : मनी लाँड्रिंग प्रकरणी निर्माता कंपनीवर ED ची कारवाई

Ponniyin Selvan : मनी लाँड्रिंग प्रकरणी निर्माता कंपनीवर ED ची कारवाई

Subscribe

नवी दिल्ली : ‘पोनियिन सेल्वन-1’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन-2’ या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या कंपनीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी कंपनीच्या परिसरात झाडाझडती घेण्यात आली आहे. (Ponniyin Selvan ED raid)

तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील LYCA प्रॉडक्शनच्या परिसरात ईडाने अंमलबजावणी संचालनालयाने झडती घेतली आहे. या कंपनीने ‘पोनियिन सेल्वन-1’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन-2’ या सारख्या हिट चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर निर्मिती केली आहे. केंद्रीय तपास संस्थेने कंपनीविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवल्यानंतर चेन्नईतील सुमारे आठ ऑफीसेसची झडती सुरू आहे.

- Advertisement -

लायका प्रॉडक्शन तमिळ चित्रपटांची निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीने आतापर्यंत काठी, एनाक्कू इनोरु पर इरुक्कू, प्रिझनर नंबर 150, यमन, इप्पडाई वेल्लम, दिया, कोल्लामावू कोकिला, चेक्का चिवंथा वनम, वडा चेन्नई यासह इतर चित्रपटांचा समावेश आहे. लायका प्रॉडक्शनने रजनीकांत यांच्या 2.0 ची निर्मिती केली. हा चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी भारतातील सर्वात महागडा भारतीय चित्रपट होता. हा चित्रपट अंदाजे 400 ते 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

- Advertisement -

कंपनीने बॉलिवूड चित्रपटाचीही केली आहे निर्मिती
लायका प्रॉडक्शनने कमल हसन स्टारर ‘इंडियन 2’ आणि रजनीकांतचा ‘लाल सलाम’ यासारखे चित्रपट बनवले आहेत, जे प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. प्रॉडक्शनच्या बॅनरखाली कंपनीने गेल्या वर्षी पहिला बॉलीवूड चित्रपट ‘राम सेतू’ तयार केला होता आणि यानंतर कंपनीने ‘पोनियिन सेल्वन’ चित्रपटाद्वारे पुनरागमन केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने ‘पोनीयिन सेलवन 1’ चित्रपटातून  महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. बऱ्याच दिवसांनंतर ऐश्वर्या या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतली. या चित्रपटाची कथा 10व्या शतकातील चोल साम्राज्याच्या सत्तासंघर्षावर आधारित आहे. हे भारतीय इतिहासातील सर्वात महान शासकांपैकी एक, राजराजा चोल बनण्याची कथा पोनियिन सेल्वनचे चित्रण करते.

- Advertisment -