घरक्राइमMumbai Airport : कोट्यवधींची तस्करी उघड; नूडल्सच्या पाकिटांमध्ये 2 कोटींचे हिरे अन्...

Mumbai Airport : कोट्यवधींची तस्करी उघड; नूडल्सच्या पाकिटांमध्ये 2 कोटींचे हिरे अन् अंतर्वस्त्रात…

Subscribe

सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावरून दोन कोटींचे हिरे आणि सहा कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी बँकॉकला हिरे घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. 

मुंबई : देशातील सर्वात वर्दळीच्या मुंबई विमानतळावर कोट्यवधींच्या तस्करीचा प्रकार उघड झाला आहे. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावरून आठवड्याच्या शेवटी 4.44 कोटी रुपयांचे 6.815 किलो सोने आणि 2.02 कोटी रुपयांचे हिरे जप्त केल्यानंतर चार प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. (Smuggling of crores exposed at Mumbai airport)

सीमा शुल्क विभागाने सोमवारी रात्री उशिरा जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, मुंबईहून बँकॉकला जाणाऱ्या एका भारतीय नागरिकाला थांबवून त्याच्या ट्रॉली बॅगची झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या बॅगेत नूडल्सची पाकिटे आढळून आली. त्यातील एक पॅकेट उघडले असता तस्करीचा प्रकार उघडकीस आला. प्रवासी नूडल्सच्या पॅकेटमध्ये लपवून हिऱ्यांची तस्करी करत होता. त्याच्या बॅगेतून 4.44 कोटी रुपयांचे 6.8 किलोपेक्षा जास्त सोने आणि 2.02 कोटी रुपयांचे हिरे आठवड्याच्या शेवटी जप्त करण्यात आले आहेत. प्रवाशाला नंतर अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Baramati: लाइटबिल जास्त आल्याने राग अनावर; महवितरणच्या महिला कर्मचाऱ्याचा घेतला जीव

अंडरगारमेंट्समध्ये सापडल्या सोन्याच्या विटा (Gold bars found in undergarments)

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीमाशुल्क अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, कोलंबोहून मुंबईला जाणाऱ्या एका विदेशी महिलेला संशयावरून थांबवण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांनी तिची झडती घेतली असता, विदेशी महिलेने तिच्या अंतर्वस्त्रांमध्ये सोन्याच्या विटा आणि सोन्याचा कापलेला तुकडा लपवून ठेवल्याचे आढळून आले, ज्याचे एकूण वजन 321 ग्रॅम होते. याशिवाय, दुबई आणि अबुधाबी येथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकी दोन आणि बहरीन, दोहा, रियाध, मस्कत, बँकॉक आणि सिंगापूर येथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकी 10 भारतीय नागरिकांनाही रोखण्यात आले आणि त्यांच्याकडे 6.199 किलो सोने आढळून आले. ज्याची किंमत 4.04 कोटी रुपये आहे. हे सोने अंगावर आणि सामानाच्या आत लपवून आणले होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई विमानतळावर तस्कारी प्रकार वाढले (Smuggling increased at Mumbai airport)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई विमानतळावरून तस्कारी करण्याचे प्रकार वाढले आहे. मागील एका घटनेत फास्ट-फूड रेस्टॉरंटचा 38 वर्षीय कर्मचारी पांडियन मुंबई विमानतळावर तस्करीचे सोने मिळवायचा आणि बाहेर तस्करी रॅकेटमधील सदस्यांना हस्तांतरीत करायचा. याप्रकरणी सीमा शुल्क विभागाने त्याला अटक केली आहे. अधिदकाऱ्यांनी सांगितले की, पांडियन हा कमिशनसाठी विमानतळावरून सोने मिळवायचा आणइ बाहेर त्याच्या रॅकेटमधील सदस्यांना द्यायचा. तो वांद्रे टी जंक्शन येथे नूरुल हसन जे आणि कलंदर अझरुद्दीन यांना सोने देणार होता. त्याच्या पट्ट्यातून अंदाजे 1.86 कोटी किमतीचे सोन्याचे सहा ओव्हल कॅप्सूल लपवल्याचे आढळून आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – Pune Crime : पुण्यात सिनेस्टाईल थरार, पळून जाणाऱ्या गुंडाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -