पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात निवडणूक लढवणार १११ शेतकरी

विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या १११ तामिळी शेतकऱ्यांनी वाराणसी येथून निवणूक अर्ज भरला आहे. पंतप्रधानांविरोधात हे शेतकरी निवडणूक लढवणार आहेत.

tamilnadu farmers
तमिळी शेतकरी (फाइल फोटो)

शेतमालाला योग्य भाव मिळाला नसल्यामुळे तमिळनाडूतील शेतकऱ्यांनी देशाच्या राजधानीत आंदोलन केले होते. या  आंदोलनातून प्रथमच शेतकऱ्यांची वेगळी बाजू समोर आली होती. मानवी सांगाडे आणि स्वःताचे मूत्र प्राशान करून यांनी सरकार विरोधात असंतोष दर्शवला होता. मात्र यांच्या आंदोलनानंतरही शेतीबाबत समस्यांवर मार्ग निघाला नाही. यासाठी आता शेतकऱ्यांनी निवडणूक लढवण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदार संघातून हे शेतकरी निवडणूक लढवणार आहेत. १११ शेतकरी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी शेतकरी करत असल्याचे तमिळनाडूतील शेतकरी नेते पी. अय्यकन्नू यांनी सांगितले आहे.

तर निडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला जाणार

२०१७ मध्ये सुमारे १०० दिवस अय्याकन्नू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. शेतकऱ्यांची शेतमालाच्या दरांबाबतची मागणी पूर्ण केली जाईल, असे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात घेतल्यास वाराणसीतून लढवण्याचा निर्णय मागे घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप हा सत्ताधारी पक्ष असून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानसल्याने त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षांनी कर्जमाफीचे आश्वासन जाहीरनाम्यात दिलिले आहे, असेही त्यांनी सांगितले.