घरCORONA UPDATECorona Update: देशात २४ तासांत कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्येत सर्वाधिक वाढ!

Corona Update: देशात २४ तासांत कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्येत सर्वाधिक वाढ!

Subscribe

देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. सातत्याने कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्येत वाढत होत आहे. देशात मागील २४ तासांत नव्या कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाल्याचे समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत सर्वाधिक १५ हजार ९६८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ५६ हजार १८३वर पोहोचली असून मृतांची संख्या १४ हजार ४७६ झाला आहे. तसेच सध्या १ लाख ८३ हजार २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २ लाख ५८ हजार ६८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील रिकव्हरी रेट ५६.७० आहे.

- Advertisement -

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. देशातील ९ राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांहून अधिक आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठ दिल्ली आणि तामिळनाडू राज्यात ५० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३९ हजार १०वर पोहोचली असून ६ हजार ५३१ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – आयुष मंत्रालयाने पतंजलीच्या कोरोना औषधाची जाहिरात थांबवली, पतंजलीने दिलं ‘हे’ उत्तर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -