घरCORONA UPDATEऔरंगाबादमध्ये चिंता कायम, कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ!

औरंगाबादमध्ये चिंता कायम, कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ!

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आज औरंगाबादमध्ये १२५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे राज्यात आता कोरोना बाधीतांची संख्या ३९६१ वर पोहोचली आहे. तर यापैकी २०६ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. आज वाढलेल्या रुग्णांपैकी ८७  रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत आहेत. तर ३८ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.  औरंगाबादमध्ये आत्तापैकी २१३६  कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात १६१९ लोकांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यात कोरोनामुळे २४८ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार २१४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज १ हजार ९२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण ६९ हजार ६३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५०.०९ % एवढे झाले आहे.

- Advertisement -

आज राज्यात ३ हजार २१४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात आज २४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यापैकी ७५ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६९ % एवढा आहे. सध्या राज्यात ६ लाख ५ हजार १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २६ हजार ५७२ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ४७० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हे ही वाचा – संतापजनक! नराधम डॉक्टराने गर्भपात करून अर्भकाचे केले तुकडे!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -