तामिळनाडू राज्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी शहराजवळ बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात अनेकजण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. केरळ राज्याची असलेली ही बस तिरुअंनतपुरमच्या (कर्नाटक) दिशेने जात होते. सकाळी ४.३० च्या सुमारास कोईम्बतूर-सालेम महामार्गावर हा अपघात घडला. बसमध्ये एकूण ४८ प्रवासी होते, त्यापैकी १९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर प्रवाशी गंभीर जखमी आहेत.
KSRTC bus which was heading from Bengaluru to Ernakulam collides with lorry in Avinashi. 17 persons confirmed dead @thenewsminute pic.twitter.com/hrFijLyX2f
— Sreedevi Jayarajan (@Sreedevi_Jay) February 20, 2020
हे वाचा – चंद्रपूर येथे भीषण अपघात; ६ भाविक ठार, ६ जखमी
#UPDATE Deputy Tehsildar of Avinashi: 19 people – 14 men and 5 women, died in the collision between a Kerala State Road Transport Corporation bus & a truck near Avinashi town of Tirupur district. https://t.co/pOss4LTAtv
— ANI (@ANI) February 20, 2020