घरदेश-विदेशLOC वर पाकिस्तानकडून गोळीबार; दोन जवान शहीद, चार जखमी

LOC वर पाकिस्तानकडून गोळीबार; दोन जवान शहीद, चार जखमी

Subscribe

पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण सीमेरेषवर चीनबरोबर तणाव तणाव असताना आता पाकिस्तानने कुरापती करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे. दरम्यान, आज देखील जम्मू-काश्मीरमधील नौगाम सेक्टर येथील LOC जवळ पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर चार जवान जखमी झाले आहेत.

पाकिस्तानने LOC जवळ सीमेरेषेवर गोळीबार केला. या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले, तर ४ जवान जखमी झाले आहेत. कुपवाडाच्या नौगाम सेक्टरमध्ये गुरुवारी सकाळी पाकिस्तानने गोळीबार केला. शिवाय, त्यांनी मोर्टारही डागले, अशी माहिती श्रीनगर मधील संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली.

- Advertisement -

पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत, तर चारजण जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सीमेरेषेवर पाकिस्तानला त्याच भाषेत भारताकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -