घरदेश-विदेशआयोध्येतील २५१ मीटर उंच रामाची मूर्ती करणार World Record!

आयोध्येतील २५१ मीटर उंच रामाची मूर्ती करणार World Record!

Subscribe

अशी आहेत भगवान रामाच्या मूर्तीचे वैशिष्ट्यं

अयोध्येत उभारल्या जाणार्‍या भगवान रामची मूर्ती जागतिक विक्रम नोंदवणार असून ही मूर्ती आतापर्यंतची जगातील सर्वात उंच मूर्ती असणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ती पूर्णपणे स्वदेशी असल्याचे सांगितले जात आहे. या मूर्तीचे संपूर्ण काम उत्तर प्रदेशातच केले जाणार आहे. त्या मूर्तीचा कोणताही भाग परदेशात बनविला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या इच्छेनुसार पुतळा येथे उभारण्यात येणार आहे. भगवान रामची मूर्ती तयार करणाऱ्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित असणारे शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार म्हणाले की, भगवान राम यांच्या मूर्तीची रचना पार पडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे.

- Advertisement -

ज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणाले की ही मूर्ती संपूर्णपणे स्वदेशी असावी. त्यानंतर त्यांनी आश्वासन दिले आहे की ही मूर्ती संपूर्णपणे स्वदेशी असेल आणि ती केवळ उत्तर प्रदेशातच बनवली जावी, जी मूर्ती सर्वात भव्य असेल. मूर्ती निर्माण करण्याचे काम सुरू झाल्यानंतर त्यास सुमारे साडेतीन वर्षांचा कालावधी लागेल. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे भूमिपूजन झाल्यानंतर मूर्ती निर्माण करण्याचे कामही लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

ही आहेत भगवान रामाच्या मूर्तीचे वैशिष्ट्यं

अयोध्येत उभारली जाणारी ही मूर्ती जागतिक विक्रम निर्माण करणारी असणार आहे. आतापर्यंत चीनमधील गौतम बुद्धाची मूर्ती जगातील सर्वात उंच आहे. त्याची उंची २०८ मीटर आहे. परंतु अयोध्येत भगवान रामांची मूर्ती २५१ मीटर उंच असणार आहे. या नव्या मूर्तीच्या निर्माणामुळे अयोध्या चीनला मागे टाकेल. त्यामुळे ही जगातील सर्वात उंच मूर्ती असेल. ज्यामध्ये अनेक वैशिष्ट्ये असतील.

- Advertisement -

यामध्ये २० मीटर उंच वर्तुळ असून ही मूर्ती ५० मीटर उंच पायावर उभी राहील. ज्याच्या पायथ्याखाली भव्य संग्रहालय असेल. जेथे भगवान विष्णूचे सर्व अवतार तंत्रज्ञानाद्वारे दर्शविले जातील. येथे डिजिटल संग्रहालय, फूड प्लाझा, लँड स्कॅपिंग, लायब्ररी, रामायण काळातील गॅलरी इ. देखील तयार केले जाणार असल्याचे सांगितले जाणार आहे.


Ayodhya : राम मंदिराच्या रचनेत बदल, नागर शैलीत असणार नवे डिझाईन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -