घरताज्या घडामोडीCorona In India: दिलासादायक! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत १३ हजारांनी घट

Corona In India: दिलासादायक! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत १३ हजारांनी घट

Subscribe

देशातील कोरोना पॉझिटिव्हीट रेट ११९.६५ टक्के झाला आहे. गेल्या २४ तासांत ३८५ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख ५१ हजार ७४० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. मात्र आज काल, रविवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत १३ हजारांनी घट झाली आहे. काल देशात २ लाख ७१ हजार २०२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. मात्र आज १३ हजार ११३ रुग्णसंख्येची घट (13,113 less than yesterday) होऊन २ लाख ५८ हजार ८९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे (2,58,089 corona cases found in india). त्यामुळे देशातील चिंतेच्या वातावरणात दिलासा देणारी ही बाब आहे.

- Advertisement -

देशातील कोरोना पॉझिटिव्हीट रेट ११९.६५ टक्के झाला आहे. गेल्या २४ तासांत ३८५ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख ५१ हजार ७४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात १६ लाख ५६ हजार ३४१ सक्रीय रुग्ण आहेत. तसेच ओमिक्रॉनबाधितांची संख्या ८ हजार २०९ पार झाली आहे. आतापर्यंत देशात ७० कोटी ३७ लाख ६२ हजार २८२ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तसेच १ अब्ज ५७ कोटी २० लाख ४१ हजार ८२५ लसीचे डोस देण्यात आले आहेत.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ३ कोटी ७३ लाख ८० हजार २५३
देशातील एकूण मृत्यूची संख्या – ४ लाख ८६ हजार ४५१
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ३ कोटी ५२ लाख ३७ हजार ४६१
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – १६ लाख ५६ हजार ३४१
देशातील एकूण ओमिक्रॉनाबाधितांची संख्या – ८ हजार २०९

- Advertisement -

हेही वाचा – One Year Of Vaccination: कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती, केंद्राकडून विशेष स्टॅम्पचे अनावरण


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -