घरदेश-विदेशकाँग्रेसच्या बैठकीला पायलट जाणार नाहीत; त्यांच्या गटाने प्रसिद्ध केला व्हिडीओ

काँग्रेसच्या बैठकीला पायलट जाणार नाहीत; त्यांच्या गटाने प्रसिद्ध केला व्हिडीओ

Subscribe

राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप कायम असून अशोक गेहलोत सरकारवरील अस्थिरतेचे संकट अद्यापही कायम आहे. काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी १०० हून अधिक आमदारांसह शक्तीप्रदर्शन केलं. राजस्थानमधील सत्तासंघर्षात वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली आहे. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्यानी केलेल्या मध्यस्थीने देखील सचिन पायलट यांनी बंडाचा पवित्रा कायम ठेवला आहे.

दरम्यान सचिन पायलट यांच्या टीमने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये १६ आमदार त्यांच्यासोबत बसले असल्याचं दिसत आहेत. सचिन पायलट यांनी याआधी आपल्याकडे ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. यामध्ये सचिन पायलट दिसत नाही आहेत. दरम्यान पायलट आणि गेहलोत यांच्यात समेट घडवण्याचे प्रयत्न सुरुच असून काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची आज मंगळवारीदेखील बैठक होणार आहे. या बैठकीला सचिन पायलट जाणार नाही आहेत.

- Advertisement -

न्यज एजन्सी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओमध्ये १६ आमदार एकत्र बसले आहेत. तथापि, व्हिडीओमध्ये पायलट दिसत नाही आहेत. व्हिडीओमध्ये इतर सहा लोक दिसत आहेत, परंतु त्यांची ओळख पटलेली नाही. इंद्रराज गुर्जर, मुकेश भाकर, हरीश मीना आहेत. पर्यटनमंत्री विश्वेन्द्र सिंह यांनी ‘फॅमिली’ या मथळ्यासह व्हिडीओ ट्विट केला आहे. लाडनूनचे आमदार मुकेश भाकर यांनी ट्विट केलं की, “कॉंग्रेसमधील निष्ठा म्हणजे अशोक गेहलोत यांची गुलामी. हे आम्हाला मान्य नाही.”

- Advertisement -

हेही वाचा – सरकार अस्थिर करणं भाजपचं पडद्यामागचं राष्ट्रीय कार्य


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -