घरताज्या घडामोडीक्यूआर कोड पास असेल, तरच लोकल प्रवासाला परवानगी

क्यूआर कोड पास असेल, तरच लोकल प्रवासाला परवानगी

Subscribe

येत्या २० जुलै पासून लोकल प्रवास करताना क्यूआर कोड पास असणे बंधनकारक असणार आहे.

१५ जूनपासून अत्यावश्यक कर्मचाऱ्यासांठी लोकल सेवा सुरू करण्यात आली. येत्या २० जुलै पासून पश्चिम रेल्वेवर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याआधी क्यूआर कोड असलेला पास बंधनकारक असणार आहे. सध्या याबाबत उद्घोषणा देखील पश्चिम रेल्वे स्थानावर केल्या जात आहेत. क्यूआर कोड पास असले तरच लोकल प्रवास करता येणार आहे. लवकरच क्यूआर कोडची अंमलबजावणी मध्य रेल्वे देखील करणार आहे.

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर प्रत्येकी ३५० लोकल फेऱ्या चालवल्या जात आहेत. सध्या रेल्वे प्रवास करण्यासाठी कार्यलयीन ओळलखपत्र दाखवून तिकीट किंवा पास उपलब्ध करून दिला जात आहे. अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या लोकल सेवेत पश्चिम रेल्वेवरून सर्वाधिक १ लाख ३० हजार प्रवाशी प्रवास करू लागले आहेत. तर मध्य रेल्वेवर ७० हजार प्रवाशी प्रवास करू लागले आहेत.

- Advertisement -

दरम्यान क्यूआर कोड पासमुळे नेमका प्रवासी समजू शकेल आणि इतर कोणत्याही प्रवाशाला प्रवास देणे शक्यही होणार नाही. तसेच घुसखोरी देखील होण्याची शक्यता नसेल. यामुळेचे २० जुलै पासून पश्चिम रेल्वेने क्यूआर कोड पासची सर्व स्थानकात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पास नसेल तर लोकल प्रवास करता येणार नाही, असे पश्चिम रेल्वे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारी कर्मचारी, पालिका, पोलीस, केंद्रीय कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड पास त्यांच्या कार्यलयाकडून उपलब्ध होईल. यासाठी मुंबई पोलिसांच्या मदतीने एक मोबाईल Appही तयार करत असल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सत्याकु मार यांनी सांगितले.


हेही वाचा – मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -