घरदेश-विदेशन्यूयॉर्कमध्ये रहस्यमय आजाराने ३ मुलांचा मृत्यू; अमेरिकेच्या ७ राज्यांत १०० रुग्ण

न्यूयॉर्कमध्ये रहस्यमय आजाराने ३ मुलांचा मृत्यू; अमेरिकेच्या ७ राज्यांत १०० रुग्ण

Subscribe

कोरोनाच्या संकटात न्यूयॉर्कमध्ये रहस्यमय आजाराने ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत या आजाराचे १०० रुग्ण आढळले आहेत.

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये तीन मुलांचा रहस्यमय आजाराने मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये ७३ रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेच्या ७ राज्यात अशा प्रकारचे १०० रुग्ण आढळले आहेत. या आजाराच्या मुलांचे वय २ ते १५ वर्षे आहे. याची माहिती राज्यपाल अँड्र्यू कुओमो यांनी दिली आहे. ते म्हणाले की रहस्यमय आजार असलेल्या बहुतेक मुलांमध्ये श्वसनाची लक्षणे दिसली नाहीत. मृत्यू झालेल्या मुलांमध्ये देखील लक्षणं दिसली नाहीत.

न्यूयॉर्क जिनोम सेंटर आणि रॉकफेलर युनिव्हर्सिटी एकत्रितपणे या आजाराचे कारण शोधण्यासाठी संशोधन करीत आहेत. आतापर्यंत मृत्यूचं प्रमाण कमी असल्यामुळे पालक, आरोग्य तज्ज्ञांना दिलासा देणारी बाब आहे. आता त्यांना अधिक जागरुक राहावे लागेल. कुओमो नवीन रोगामुळे होणाऱ्या मृत्यूविषयी माध्यमांना माहिती देताना न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे १० मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. या मुलांचा मृत्यू रहस्यमय आजाराने झाला की नाही हे आरोग्य विभाग तपास करीत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पॅरामिलिट्री फोर्समध्ये कोरोनाचा कहर, आतापर्यंत ७५० जणांना लागण


ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि स्वित्झर्लंडमध्येही ५० रुग्ण

युरोपियन देशांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि इटलीमध्येही या रहस्यमय आजाराची जवळपास ५० प्रकरणे नोंदली गेली आहेत. WHO च्या वैज्ञानिक डॉ. मारिया व्हॅन कर्खोव यांनी याची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, युरोपियन देशांमध्ये या आजाराची लक्षणे लहानपणाच्या कावासाकीच्या लक्षणांप्रमाणेच आहेत. जसे की हात पाय सूज येणे, शरीरात डाग इ. अमेरिकेतही अशीच लक्षणे दिसली आहेत.

- Advertisement -

लक्षणे

डॉक्टरांच्या मते, या रहस्यमय आजारामध्ये त्वचा आणि रक्तवाहिन्या फुगतात. डोळ्यांची जळजळ. शरीरावर डाग तयार होतात. त्वचेचा रंग बदलू लागतो. दीर्घकाळ ताप, पोट आणि छातीत तीव्र वेदना होतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -