घरदेश-विदेशLACवर ३० हजार भारतीय जवान तैनात, चीनसोबत तणाव वाढला!

LACवर ३० हजार भारतीय जवान तैनात, चीनसोबत तणाव वाढला!

Subscribe

भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवान प्रांतात झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमधले संबंध बिघडले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लडाखमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात केलं आहे. लडाखमध्ये एकूण ३० हजार जवानांना तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या महिन्यात अक्साई चीनजवळच्या गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते, तर ७० जवान जखमी झाले होते. यानंतर भारताने लडाख प्रांतात अतिरिक्त कुमक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. आयएएनएसच्या माहितीनुसार एलएसी अर्थात Line of Actual Controlजवळ सामान्य परिस्थितीत ६ ब्रिगेड म्हणजेच २ डिविजन तैनात केल्या जातात. मात्र, सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये ३ डिविजन तैनात करण्यात आल्या आहेत.

याशिवाय, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून एलएसीवर जवळपास १० हजार जवान तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करून चीनला अप्रत्यक्षपणे इशाराच दिल्याचं मानलं जात आहे.

- Advertisement -

याशिवाय २०१७ साली भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅरा स्पेशल फोर्सेसला देखील लडाखमध्ये पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे भारताच्या बाजूने सीमाभाग अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे चीनकडून देखील या भागामध्ये वारंवार हालचाली केल्या जात असल्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध अधिकाधिक तणावपूर्ण होऊ लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -