घरताज्या घडामोडीOmicron Variant : आग्रामधून ४५ विदेशी पर्यटक बेपत्ता, आरोग्य विभाग आणि LIU...

Omicron Variant : आग्रामधून ४५ विदेशी पर्यटक बेपत्ता, आरोग्य विभाग आणि LIU कडून शोधकार्य सुरू

Subscribe

ताजनगरी आग्रामध्ये ४५ विदेशी पर्यटक गायब झाल्याची माहिती मिळताच आग्राचे आरोग्य विभाग जिल्हा प्रशासन आणि पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. कोरोना व्हायरच्या तिसऱ्या लाटेमुळे व ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे आग्रातील विदेशी पर्यटकांवर नजर ठेवण्यात आली आहे. दरम्यान, बेपत्ता झालेल्या पर्यटकांचा आरोग्य विभाग व लोकल इंटेलीजेन्स यूनिट कडून शोधकार्य सुरू आहे.

कोविड-१९ च्या धोकादायक व्हेरियंटमुळे विदेशी पर्यटक आग्राला पोहोचले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून त्यांचा तपास घेतला जात आहे. विदेशी पर्यटकांसाठी आरोग्य विभागाने आणि प्रशासनाने ४५ विदेशी पर्यंटकांसाठी चार रॅपिड रिस्पॉन्स टीमची संघटना तयार करण्यात आली आहे.

- Advertisement -

विदेशी पर्यटकांचा शोध आग्राच्या लोकल पोलिसांकडून आणि इंटेलीजन्सच्या यूनिटकडून घेतला जात आहे. आग्राच्या सर्व हॉटेलमध्ये ४५ विदेशांची तपासणी करण्यात येत आहे. मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. अरूण कुमार श्रीवास्तव यांनी सांगितलं की, ओमिक्रॉन व्हायरचा धोका वाढत असून विदेशी पर्यटकांची स्कॅनिंग केली जात आहे.


हेही वाचा: Omicron Variant : प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी कोविड सेंटर तयार : अस्लम

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -