घरताज्या घडामोडीOmicron Variant : प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी कोविड सेंटर तयार : अस्लम शेख

Omicron Variant : प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी कोविड सेंटर तयार : अस्लम शेख

Subscribe

जगभरातील अनेक देशांत कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. ओमिक्रॉनचे नवीन संक्रमण मोठ्या संख्येने वाढत आहे. भारतामध्ये ओमिक्रॉनचा धोका वाढत असल्यामुळे केंद्र व राज्य सरकरांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होत आहे. महाराष्ट्रामध्ये ओमिक्रॉनचे केस वाढत आहेत. दरम्यान, सर्व हॉस्पिटल आणि कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी प्रतिक्रिया मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.

मुंबईला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जी लोकं बाहेरून येत आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी कोविड सेंटर तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर २० हॉटेलदेखील आहेत. जिथे ते राहू शकतात. सर्व हॉस्पिटल आणि कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी प्रतिक्रिया मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.

- Advertisement -

देशात पाच राज्यांत ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. ओमिक्रॉन सोबतच संक्रमित संख्येमध्ये बढोत्तरी होत आहे. पहिल्यांदा३ दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर ३० पेक्षा जास्त लोक यामध्ये आढळून आले. भारतामध्ये २३ नवीन रूग्णांची संख्या वाढली आहे. ज्यानंतर सरकार व आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर चौकशी देखील वाढवण्यात आली आहे. एन्ट्रीच्या पहिल्यांदाच प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे. WHO ने ओमिक्रॉनच्या चिंतेत भर केली आहे. तसेच नागरिकांना सुद्धा याबाबत चेतावणी देण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, पुण्याचे कोविड जिल्हा निरीक्षक अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर जवळपास कोविड-१९ साठी जवळपास ३० हजार प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये १० जणांचा रिपोर्ट पाहिला असता ओमिक्रॉनचा विषाणू आढळून आला असून पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -