घरक्रीडाharbhajan singh : हरभजन सिंग लवकरच घेऊ शकतो संन्यास; IPL 2022 च्या...

harbhajan singh : हरभजन सिंग लवकरच घेऊ शकतो संन्यास; IPL 2022 च्या खेळाडूंची बोली लावताना दिसणार भज्जी?

Subscribe

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याची शक्यता आहे

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याची शक्यता आहे. दरम्यान तो इंडियन प्रीमियर लीगचा हिस्सा असणार आहे. मात्र खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये देखील दिसणार नाही. हरभजन सिंग आयपीएल २०२२ च्या फँचायझीसोबत सहयोगी स्टाफचा महत्त्वाचा सदस्य म्हणून दिसणार आहे. पीटीआय वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार हा दावा केला जात आहे. आयपीएल २०२१ च्या पहिल्या सत्रात ४१ वर्षीय हरभजन सिंगने कोलकाता नाईट रायडर्स काही सामने खेळले होते. मात्र यूएईतील दुसऱ्या सत्रात तो एकही सामना खेळला नव्हता.

दरम्यान, हरभजन सिंग पुढच्या आठवड्यात एक खेळा़डू म्हणून अधिकृतरित्या संन्यास घेऊ शकतो. यानंतर तो काही आयपीएलच्या फँचायझींसोबत देखील जोडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएलच्या एका सदस्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, “हरभजनची ही भूमिका सल्लागार, मार्गदर्शक किंवा सल्लागार समूहाचा हिस्सा बनण्यासाठीची असू शकते”. लक्षणीय बाब म्हणजे ते ज्या फँचायझीबाबत भाष्य करत आहेत ती फँचायझी हरभजनच्या अनुभवाचा उपयोग करण्यासाठी त्याला आपल्याकडे घेत आहे. मात्र ती कोणती फँचायझी आहे ते अद्याप उघड झाले नाही. तो लिलावातील खेळाडूंच्या निवडीबाबत मदत करण्यात सक्रिय भूमिका पार पाडेल.

- Advertisement -

जर आयपीएल २०२२ साठी होणाऱ्या लिलावात हरभजन सिंग खेळाडूंची बोली लावताना दिसला तर ते नवीन नसणार आहे. कारण हरभजनने यापूर्वीही खेळाडूंच्या निवडीबाबत आवड कल दाखवला होता. भज्जी एक दशकापर्यंत मुंबई इंडियन्सच्या संघाचा हिस्सा राहिला होता. मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या वर्षात देखील संघात त्याची हिच भूमिका होती. हरभजनने मागील वर्षी केकेआरच्या संघासोबत जोडल्यानंतर खूप वेळ वरूण चक्रवर्तीला मार्दर्शन केले होते.


हे ही वाचा: http://AUS vs ENG 1st Test : भारतीय वेळेनुसार कधी आणि कुठे पाहू शकतो ॲशेसचे सामने?; जाणून घ्या

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -