घरदेश-विदेशBus Accident : छत्तीसगडमध्ये मजुरांना घेऊन जाणारी बस खाणीत कोसळली; 15 जणांचा...

Bus Accident : छत्तीसगडमध्ये मजुरांना घेऊन जाणारी बस खाणीत कोसळली; 15 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

Subscribe

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील 'मुरुम' मातीच्या खाणीत मंगळवारी (10 एप्रिल) रात्री उशीरा बस खाणीत कोसळल्याने आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून डझनहून अधिक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

दुर्ग : छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील ‘मुरुम’ मातीच्या खाणीत मंगळवारी (10 एप्रिल) रात्री उशीरा बस खाणीत कोसळल्याने आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून डझनहून अधिक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. बसमधील सर्वजण खासगी कंपनीचे कर्मचारी होते, अशी माहीती पोलिसांनी दिली आहे. (A bus carrying laborers fell into a mine in Chhattisgarh 15 people died and many injured)

दुर्ग पोलीस अधीक्षक जितेंद्र शुक्ला यांनी सांगितले की, कुम्हारी पोलीस स्टेशन हद्दीतील खापरी गावाजवळ रात्री 8.30 च्या सुमारास एका डिस्टिलरी कंपनीचे कर्मचारी काम संपवून घरी परतत असताना अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, 30 हून अधिक जणांना घेऊन जाणारी बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या 40 फूट खोल ‘मुरुम’ खाणीत म्हणजेच बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या खाणीत पडली. अपघातात सुरुवातीला 11 जणांचा मृत्यू झाला तर त्यानंतर उपचारादरम्यान, आणखी 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

शहर पोलीस अधीक्षक हरीश पाटील यांनी सांगितले की, अलर्ट मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून जखमींच्या उपचारासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले आहे.

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

दरम्यान, छत्तीसगडमध्ये झालेल्या बस अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात बस अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. सर्व शोकग्रस्त कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना. जखमी व्यक्तींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दुर्ग जिल्ह्यातील बस दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल मी शोक व्यक्त करतो. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो. प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे, असेही मोदींनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -