घरमहाराष्ट्रSupriya Sule : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यावर कारवाई गरजेची; सुप्रिया सुळेंनी मनुगंटीवारांवर...

Supriya Sule : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यावर कारवाई गरजेची; सुप्रिया सुळेंनी मनुगंटीवारांवर साधला निशाणा

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूरमधील जाहीर सभेद्वारे महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले असले तरी, आता काँग्रेसने चंद्रपूरमधील भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. खोटी आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसने केली असून त्यांच्याविरोधी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. (Action is needed against the minister who made offensive statement Supriya Sule targeted Sudhir Manugantiwar)

सुधीर मुनगंटीवार यांचं नाव न घेता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मोदी हे एका पक्षाचे नाही तर देशाच प्रधानमंत्री आहे. त्यामुळे या देशाची एक नागरीक म्हणून मी मोदींना एवढीच विनंती करेल की, व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाच्या एका मंत्र्यांने अत्यंत गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात केलं आहे. त्या मंत्र्याबद्दल मोदींनी काहीतरी कारवाई करावी. कारण राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. सगळ्याच पक्षाच्या आम्ही सर्वांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. मागच्या आठवड्यात मोदींच्या समोर एक गलिच्छ वाक्य जे बोलणं झाल ते कुठेतरी थांबलं पाहिजे. मी स्वत: त्याचा जाहीर निषेध करते. माझी अपेक्षा आहे की, मोदी एका पक्षाचे असले तरी ते आपल्या सर्वांचे प्रधानमंत्री आहे. त्यामुळे त्यांच्या प्रधानमंत्र्यांच्या पदाचा मानसन्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी केला पाहिजे. अशी गलिच्छ भाषा थांबली पाहिजे आणि अशा व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे.

- Advertisement -

हेही वाचा – Supriya Sule : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यावर कारवाई गरजेची; सुप्रिया सुळेंनी मनुगंटीवारांवर साधला निशाणा

- Advertisement -

सुधीर मुनगंटीवार आपल्या वक्तव्यावर ठाम

दरम्यान, विरोधकांनी आरोप केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी ट्वीट करत आपली बाजू मांडली आहे. त्यांनी म्हटले की, 1984 साली काँग्रेसने केलेल्या अत्याचारांची आठवण करून दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. परंतु अर्धवट क्लिप वायरल करुन काँग्रेसने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही. 1984 च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छाती ठोकपणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावं. काँग्रेसच्या हुकूमशाही राजवटीवर मी नेहमी बोलत राहीन आणि तुमच्या अशा खोडसाळपणामुळे मी बिलकुल घाबरणार नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Breakaing : शरद पवार गटाकडून 10 पैकी 9 उमेदवार जाहीर, दुसऱ्या यादीत सातारा, रावेर; तिसऱ्या यादीची प्रतीक्षाच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -