घरमुंबईBombay High Court: ...तर बायकोने नवऱ्याला पोटगी द्यावी; उच्च न्यायालयाचा निर्णय

Bombay High Court: …तर बायकोने नवऱ्याला पोटगी द्यावी; उच्च न्यायालयाचा निर्णय

Subscribe

हिंदू विवाह कायदा स्त्री-पुरुष असा भेद करणारा नसून त्यातील तरतुदींनुसार पत्नी अथवा पतीलादेखील त्याच्या जोडीदाराकडून पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

मुंबई: हिंदू विवाह कायदा स्त्री-पुरुष असा भेद करणारा नसून त्यातील तरतुदींनुसार पत्नी अथवा पतीलादेखील त्याच्या जोडीदाराकडून पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आजारपण वा अन्य कारणामुळे उत्पन्न कमावण्यास सक्षम नसलेल्या बेरोजगार पतीला कमावत्या पत्नीकडून पोटगी मागण्याचा कायदेशीर हक्कच आहे, असं स्पष्ट करत न्यायालयाने बेरोजगावर पतीला दरमहा 10 हजार रुपयांची पत्नीने पोटगी द्यावी, असं म्हटलं आहे. (Bombay High Court then the wife should pay maintenance to the husband High Court decision)

नेमकं प्रकरण काय?

कल्याणमध्ये हे प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीने संसारात मतभेद होत असल्याने पत्नीपासून विभक्त होण्यासाठी कल्याणच्या न्यायालयात धाव घेतली. पती-पत्नी दोघांनीही पोटगी मागत अर्ज केले. यापैकी पत्नीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला, तर पतीचा अर्ज मंजूर करत पत्नीने पतीला 10 हजारांची पोटगी दर महा द्यावी असा आदेश दिला आहे.

- Advertisement -

आजारपणामुळे कमाई करण्यास सक्षम नसलेल्या पतीला कमावत्या पत्नीने दरमहा 10 हजार रुपयांची अंतरिम पोटगी द्यावी, असं न्यायालायने म्हटलं आहे.

सहदिवाणी न्यायाधीशांनी 13 मार्च 2020 रोजी दिलेल्या या आदेशाला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. परंतु न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी पत्नीचं अपिल फेटाळून लावत पतीला पोटगी देण्याचा कल्याण न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

- Advertisement -

पती त्याच्या आजारपणामुळे कमाई करु शकत नाही. मात्र पत्नी चांगल्या पगाराच्या नोकरीतून पुरेसे उत्पन्न कमावण्यास सक्षम आहे. त्यामुळे या कमावत्या पत्नीकडून पोटगी मागण्याचा बेरोजगार पतीला कायदेशीर हक्क आहे, असं उच्च न्यायालयाने नमूद केलं आहे.

न्यायालय काय म्हणालं?

  • हिंदू विवाह कायद्याच्या कलम 24 च्या तरतुदींमध्ये जोडीदार हा शब्द वापरला आहे. जोडीदार या व्याख्येत पती आणइ पत्नी या दोघांचाही समावेश होतो.
  • स्वत:चा सांभाळ करू न शकणाऱ्या पती व पत्नीला सक्षम जोडीदाराने खटला प्रलंबित असताना अंतरिम पोटगी दिली पाहिजे.

(हेही वाचा: Thackeray group : देशात बनवाबनवी, हुकूमशाहीचा उच्छाद; ठाकरे गटाचा घणाघात)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -