घरदेश-विदेशड्रायव्हिंग लायसन्ससाठी आधार हवेच!!

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आधार हवेच!!

Subscribe

बनावट लायसन्सना लगाम घालण्यासाठी आता केंद्र सरकार कडक पावलं उचलणार आहे. कारण, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स काढताना आता आधार लिंक करणं अनिवार्य करण्यात येणार आहे.

बनावट लायसन्सना लगाम घालण्यासाठी आता केंद्र सरकार कडक पावलं उचलणार आहे. कारण, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स काढताना आता आधार लिंक करणं अनिवार्य करण्यात येणार आहे. केंद्रीय रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्याबाबत लवकरच आम्ही कायदा करणार असल्याची माहिती रवी शंकर प्रसाद यांनी दिली. १०६व्या विज्ञान काँग्रेसमध्ये केलेल्या अध्यक्षीय भाषणात रवी शंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती दिली. अपघात करून पळून जाणाऱ्या दोषी व्यक्तिला त्यानंतर देखील ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं. परिणामी, त्याला सहजपणे सुटणे शक्य होते. आधार कार्ड अनिवार्य केल्यास मात्र या साऱ्या गोष्टी करता येणार नाहीत. शिवाय, बनावट लायसन्सला देखील आळा बसेल. यावेळी रविशंकर प्रसाद यांनी आधार कार्ड अनिवार्य केल्यामुळे होणार फायदे देखील नमुद केले.

वाचा – सिम कार्डसाठी होते आधार कार्डची मागणी

वाचा – आधार कार्ड नसल्याने बँक खाते उघडण्यास नकार

वाचा – ‘आधार कार्ड’ साधार की निराधार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -