घरदेश-विदेश'आधार कार्ड' साधार की निराधार?

‘आधार कार्ड’ साधार की निराधार?

Subscribe

आधार कार्डच्या अनिवार्य वापरामुळे सामान्य लोकांचं आयुष्य चव्हाट्यावर आलं आहे, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे आधार पूर्णत: सेफ असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

आधार कार्ड वैध की अवैध याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगते आहे. मात्र, अखेर सुप्रीम कोर्ट याविषयीचा अंतिम निर्णय बुधवारी (उद्या) सांगणार आहे. आधार कार्डच्या वैधतेला आवाहन देणाऱ्या २७ याचिकांवर गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु होते. दरम्यान बुधवारी याविषयीची अतिंम सुनावणी सुप्रीम कोर्टाकडून करण्यात येणार आहे. खरंतर या प्रकरणाची सुनावणी जानेवारीमध्येच सुरु झाली होती. त्यानंतर पुढे साधारण ३८ दिवसांपर्यंत ती सुरु राहिली. उच्च न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने याप्रकरणाची सुनावणी केली होती. सरकारने जनहितार्थ राबवलेल्या योजनांचा लोकांना लाभ घेता यावा, यासाठी आधार कार्ड अनिवार्य केले होते. याशिवाय बँक अकाउंट उघडण्यासाठी, पॅन कार्ड बनवण्यासाठी, फोन सर्व्हिसाठी तसेच पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी देखील आधार कार्ड अनिवार्य केलं होतं. कारण आधार कार्डला प्रत्येक व्यक्तीच्या ओळख पत्राचा तसंच अॅड्रेस प्रुफचा दर्जा देण्यात आला आहे.

याचिकाकर्ते विरुद्ध सरकार

मात्र, आधार कार्ड वैधतेच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आधार कार्डच्या सर्व ठिकाणच्या अनिवार्य वापरामुळे सामान्य लोकांचं आयुष्य चव्हाट्यावर आलं आहे. त्यामुळे आधार कार्ड ही संकल्पनाच नष्ट केली पाहिजे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने आधार कार्डच्या बाजूने आपली मतं मांडली आहेत. सरकारचा सर्वात मोठा दावा हा आहे की, आधार कार्डच्या साहाय्यानेच लाभार्थी कोणत्याही अडचणींशिवाय सर्व योजनांचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे आधार कार्ड पूर्णत: सुरक्षित असल्याचं आधार डेटा, केंद्र सरकार आणि आधार ऑथरिटीचं म्हणणं आहे. दरम्यान आता याबाबत सुप्रीम कोर्ट बुधवारी काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -