घरमुंबईरेल्वे गाड्यांना ‘पीओएस मशीन’ देणार

रेल्वे गाड्यांना ‘पीओएस मशीन’ देणार

Subscribe

31 मार्चपर्यंत सर्व कॅटरिंग स्टाफला मशीन वितरीत होणार

रेल्वे गाड्यांमध्ये पीओएस मशीन नाहीत. ज्या गाड्यांमध्ये त्या बसवण्यात आलेल्या आहेत. त्यांची संख्याही खूप कमी आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांकडून भूक लागलेल्या प्रवाशांना वेठीस धरून त्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. यासंबंधी वृत्त सर्वप्रथम दैनिक ‘आपलं महानगर’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये 31 मार्च 2019 पर्यंत सर्व ट्रेनमधील कॅटरिंग स्टाफ आणि टीटीई यांना पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीन वितरीत करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

रेल्वेच्या पेंट्रीकारमध्ये प्रवासा दरम्यान खानपान सेवेसाठी रक्कम जादा केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे आयआरसीटीसीने पेंट्रीकारमध्ये पीओएस (पॉइंट ऑफ सेल) मशीन लावण्याचा निर्णय घेतला होता. स्वाईप मशीनच्या माध्यमातून खाद्यपदार्थांची बिल अदा करीत होते. यामुळे जादा पैसे वसूल केल्याचे प्रकारही कमी झाले होते. परंतू पेंट्रीकार संचालकांनी स्वाईप मशीन उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसे लक्ष दिले नाही. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. पियुष गोयल यांनी 31 मार्च 2019 पर्यंत सर्व ट्रेनमधील कॅटरिंग स्टाफकडे पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीन वितरीत करण्याचा आदेश दिला आहे. या मशीनमध्ये स्वाइप करण्याची तसेच बिल जनरेट करण्याची सुविधा आहे. यामुळे जेवणासाठी जास्त किंमत आकारणार्‍या कॅटररविरोधात होणार्‍या तक्रारींची दखल घेण्यासही मदत मिळणार आहे. रेल्वेमधील कॅटरिंग सेवेत पारदर्शकता यावी यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -