घरदेश-विदेशकाँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दुर्घटना; कर्नाटकात 4 कार्यकर्त्यांना बसला विजेचा शॉक

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दुर्घटना; कर्नाटकात 4 कार्यकर्त्यांना बसला विजेचा शॉक

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. त्यांच्या यात्रेत प्रत्येक राज्यातून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. दरम्यान ही यात्रा कर्नाटकात पोहचली त्यावेळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. कर्नाटकच्या बळ्ळारीमध्ये यात्रेदरम्यान 4 कार्यकर्त्यांना विजेचा जब्बर शॉक लागला आहे. यात कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना रविवारी (16 ऑक्टोबर 2022) रोजी सकाळी कर्नाटकच्या बळ्ळारीमध्ये घडली आहे. या ठिकाणाहून आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा मौका गावात पोहचली असताना काही कार्यकर्त्यांना अचानक विजेचा शॉक बसला, पक्षाचा झेंडा हातात घेऊन निघालेले कार्यकर्ते अचानक खाली कोसळले. यामुळे सुरुवातीला काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली, मात्र काही वेळातचं नेमकं काय घडलं हे इतरांच्या लक्षात आले.

- Advertisement -

या घटनेवर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करत रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.

- Advertisement -

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्र सुरु आहे. 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा 3750 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये येऊ थांबेल. यात्रेत सहभागी सर्व सदस्य या कालावधीत 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जातील.


निवडणूक येईपर्यंत ते भाजपमध्ये राहतील का? हा त्यांचा चौथा पक्ष; राणेंच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचा पलटवार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -