घरदेश-विदेशअदानी हमाम में सब..., तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांची शरद पवारांवर टीका

अदानी हमाम में सब…, तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांची शरद पवारांवर टीका

Subscribe

नवी दिल्ली : अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी आज, गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’मध्ये भेट घेतली. बंददाराआड सुमारे दोन तास झालेल्या या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात असून राजकीय वर्तुळात मात्र उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. तर, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी, ‘अदानी हमाम में सब नंगे हैं,’ अशी टिप्पणी केली आहे.

काँग्रेसने, प्रामुख्याने राहुल गांधी यांनी कायम गौतम अदानी यांच्यावर टीका केली आहे. हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेच्या अहवालावरून राहुल गांधींसह अन्य विरोधकांनी मोदी सरकार आणि गौतम अदानी यांच्याविरुद्ध रान उठवले होते. पण शरद पवार यांनी, गौतम अदानी यांच्यापेक्षा देशात बेरोजगारी, महागाई, शेतीचे प्रश्न यांसारखे देखील मुद्दे आहेत. तसेच हिंडेनबर्ग ही बाहेरची संस्था असून त्या संस्थेवर आपण किती लक्ष केंद्रीत करायचे, हे आपण ठरवले पाहिजे, असे म्हणत विरोधकांना घरचा आहेर दिला होता.

- Advertisement -

शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात आज, गुरुवारी झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अदानी मुद्द्यावर सुरुवातीपासूनच आक्रमक असलेल्या महुआ मोइत्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांनी दावा केला की, या प्रसिद्ध उद्योगपतीने आपल्या ‘मित्रां’मार्फत तिच्यासह इतरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. अदानींशी समोरासमोर चर्चा करण्यासारखे आपाल्याकडे काही नाही, असे सांगून महुआ म्हणाल्या की, जोपर्यंत सरकार कारवाई करत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकारण्याने त्यांच्याशी संबंध ठेवू नये.

- Advertisement -

खासदार महुआ मोइत्रा यांनी शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर जोरदार हल्ला चढवला. महुआ यांनी आपल्या ट्विटरवरून वृत्तपत्राचे कटिंग शेअर केले आहे. ‘अदानी हमाम में सब नंगे है’, असे त्याला कॅप्शन दिले आहे. महान मराठ्यांचा सामना करताना मला भीती वाटत नाही. जुन्या संबंधांपेक्षा देशाला प्राधान्य देण्याची जाणीव त्यांच्याकडे असेल, एवढीच अपेक्षा आहे. तसेच, माझे ट्वीट विरोधकांच्या एकजुटीविरोधी नाही, तर जनहिताच्या बाजूने आहे, असेही महुआ मोइत्रा यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -