घरताज्या घडामोडीअमेरिकन एअरफोर्सच्या विमानात अफगाणी महिलेने दिला बाळाला जन्म

अमेरिकन एअरफोर्सच्या विमानात अफगाणी महिलेने दिला बाळाला जन्म

Subscribe

एका अफगाण महिलेने शनिवारी जर्मनीत अमेरिकेच्या विमानात एका गोंडस मुलीला जन्म दिला. अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून अफगाण आईला विमानातून बाहेर काढण्यासाठी मदत करणाऱ्या अमेरिकन कर्मचाऱ्यांचा फोटो शेअर केला असून तो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करता लिहिले होते की, ‘विमानात बाळाला जन्म दिल्यानंतरचे काही क्षण. एका अफगाण आई आणि तिच्या कुटुंबियांना ८६ व्या वैद्यकीय समूहाचे वैद्यकीय सहाय्यक कर्मचारी यांनी अमेरिकन हवाई दलाच्या सी-१७ ग्लोबमास्टरमध्ये मदत केली. यावेळी तिने जर्मनीच्या रामस्टीन एअरबेसवर विमानात एका बाळाला जन्म दिला.’

विमानात उतरताच अमेरिकेच्या एअरमॅन विमानात पोहोचले आणि त्यांनी बाळाला विमानाच्या कार्गो बेमध्ये नेले. यूएस मोबिलीट कमांडने ट्विट केले आहे की, ‘आई आणि बाळाला जवळच्या रुग्णालयात नेले गेले आणि त्यांची प्रकृती ठीक आहे.’

- Advertisement -

जेव्हा तालिबानने काबुलमधील सत्तेवर कब्जा केला, तेव्हापासून अफगाणिस्तानातील लोकं मिळेल त्या मार्गाने दुसऱ्या देशात जात आहेत. अमेरिकेकडून अफगाणिस्तानातून हजारो अमेरिकन नागरिकांना आणि अफगान सहकाऱ्यांना बाहेर काढत असताना हे वृत्त समोर आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून सर्व अमेरिकन आणि सहयोगींना बाहेर काढण्याचे आश्वासन दिले आहे आणि अफगाणिस्तानातून बाहेर काढणे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि सर्वात कठीण एअरलिफ्ट असल्याचे म्हटले आहे.


हेही वाचा – तब्बल १०० तालिबानी दहशतवाद्यांना ठार करणारा अफगाण शेरशाह

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -