आफताबने ‘या’ तलावात फेकले होते श्रद्धाचे शीर; दिल्ली पोलीस तलाव करणार रिकामी

अफताब-श्रद्धा 'लिव्ह-इन' रिलेशनशीप हत्येप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. अफताबच्या चौकशीनंतर दिल्ली पोलीस हत्येप्रकरणी युद्धपातळीवर चौकशी करत असून, सध्या पोलीस श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधत आहेत.

14 days judicial custody to accused Aftab in Shraddha Walker murder case

अफताब-श्रद्धा ‘लिव्ह-इन’ रिलेशनशीप हत्येप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. अफताबच्या चौकशीनंतर दिल्ली पोलीस हत्येप्रकरणी युद्धपातळीवर चौकशी करत असून, सध्या पोलीस श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधत आहेत. नुकताच पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाचे शीर एका तलावात टाकले होते. त्यामुळे दिल्ली पोलीस आणि महापालिकेची टीम एक मोठे तलाव रिकामे करत असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छतरपुर एनक्लेव येथील तलावात आफताबने श्रद्धाचे शीर फेकले होते. या तलावातील संपूर्ण पाणी पोलीस उपसत असून, यामध्ये श्रद्धाचे शीर हाती लागण्याची पोलिसांना आशा आहे.
शिवाय, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केलेले हत्यार देखील दिल्ली पोलीस शोधत आहेत. आफताबने ते कचरा कुंडीत टाकल्याचे म्हटले आहे. तिचे कपडे कुठे टाकले ते देखील पोलीस शोधत आहेत. पोलीस आता शेजारच्या राज्यातही आफताबने कुठे कुठे भेट दिलेली तिथे शोध घेत आहेत.

दरम्यान, दिल्ली पोलिसांना आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे १७ हाडांचे तुकडे सापडले आहेत. ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. हाडांचे तुकडे पाहून फॉरेन्सिक एक्स्पर्टचे म्हणणे आहे की ते मानवाचेच आहेत. त्यामुळे ही हाडे श्रद्धाचीच आहेत हे सिद्ध करणे आता एक मोठे आव्हान बनले आहे. या हाडांच्या माहितीसाठी डीएनए टेस्टिंगही केली जात आहे. या हाडांमध्ये जांघेतील हाड देखील आहे. या हाड़ांवर धारधार हत्याराने कापल्याचेही दिसत आहे.


हेही वाचा – पंचतारांकित रेडिसन ब्लू हॉटेलचे मालक अमित जैन यांची आत्महत्या, घरात आढळला मृतदेह