घरताज्या घडामोडीCoronaVirus: गोव्यानंतर आता 'हे' राज्य कोरोनामुक्त!

CoronaVirus: गोव्यानंतर आता ‘हे’ राज्य कोरोनामुक्त!

Subscribe

मणिपूरमधील दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता ते दोन्ही रुग्ण बरे झाले असल्याचं मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

देशात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८ हजारहून अधिक झाली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहेत. दरम्यान दिलासादायक बातमी समोर आली आहे. गोव्यानंतर मणिपूर राज्य कोरोना विषाणूपासून मुक्त झाल्याची माहिती मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांनी सोमवारी दिली. कोरोनाची लागण झालेले दोन रुग्ण बरे झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. रविवारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती दिली होती. परंतु केंद्राने घोषित केल्यानुसार ३ मेपर्यंत गोव्यातही लॉकडाऊन असणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं होत.

‘मला मणिपूर कोविड-१९ पासून मुक्त झाल्याबद्दल सांगत असताना खूप आनंद होत आहे. राज्यात कोरोनाची लागण झालेले दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्याचा अहवाला निगेटिव्ह आला आहे. आता राज्यात कोरोनाचा एक रुग्ण नाही’, असं मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांनी सांगितलं.

- Advertisement -

ईशान्य भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सोमवारपासून काही ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. ईशान्य भारतात रविवारपासून एक नवीन रुग्ण आढळला नाही आहे.

- Advertisement -

मणिपूरमध्ये मार्च महिन्यात २३ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मणिपूरमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला होतो. सगळ्यांना होम क्वारंटाईन राहण्याचा तसंच कोणतीही लक्षणे आढळल्यास लपवू न ठेवण्याचे आवाहन राज्य सरकारने केलं होत. जनतेने राज्यातील आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे मणिपूर राज्य कोरोनामुक्त झालं आहे.


हेही वाचा – …तर लॉकडाऊनमध्येही तुम्हाला मिळू शकते दारू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -