घरताज्या घडामोडीनराधम बाप! पत्नीच्या मृत्यूनंतर करत होता १३ वर्षीय मुलीवर बलात्कार

नराधम बाप! पत्नीच्या मृत्यूनंतर करत होता १३ वर्षीय मुलीवर बलात्कार

Subscribe

हरियाणामधील फतेहबादमध्ये एक ४० वर्षीय पिता आपल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपर्यंत बलात्कार करत असल्याचे समोर आले आहे.

हरियाणामध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. हरियाणामधील फतेहबादमध्ये एक ४० वर्षीय पिता आपल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपर्यंत बलात्कार करत असल्याचे समोर आले आहे. ज्यानंतर तिला दिवस गेले. काही दिवसांपूर्वी या अल्पवयीन मुलीने सातव्या महिन्यात एका मुलीला जन्म दिला. मात्र, त्यानंतर काही वेळातच रविवारी रात्री या नवजात बाळाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात मुलीच्या तक्रारीनंतर १५ दिवसांपूर्वी आरोपी पितावर पोस्को अॅक्टअंतर्गत केस दाखल केली.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; उत्तर प्रदेशमध्ये एक व्यक्ती त्याच्या दोन मुली आणि एका मुलीसह गावात राहत असल्याचे समोर आले. तसेच त्याच्या पत्नीचे साधारणतीन वर्षांपूर्वी निधन देखील झाले होते. या घटनेनंतर हा पिता आपल्या मुलीवर बलात्कार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

या प्रकरणाची सूचना चाइल्ड हेल्प लाइनवर पोहोचल्यानंतर बाल संरक्षण अधिकारी सुरजीत बाजिया यांच्या नेतृत्वात टीम मुलीजवळ पोहोचली. टीमने मुलीकडून घडलेल्या घटनेविषयी विचारले. त्यावेळी तिने सांगितले की, तीन वर्षांपूर्वी तिच्या आईचा मृत्यू झाला होता. तिचे वडील खूप काळापासून तिच्यावर बलात्कार करीत होते. सांगितले जात आहे की, मुलीच्या पोटात तब्बल सात महिन्यांचा गर्भ होता. यामुळे तिला गर्भपाताची परवानगी मिळाली नाही.


हेही वाचा – ‘शेतकऱ्यांना दहशतवादी बोलणारी कंगना नटवी, तिला पुढं करणारे लोक शिखंडी’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -