घरCORONA UPDATECorona Vaccine : 'जुलै २०२१ पर्यंत भारतीयांना लस पोहोचवण्याचे लक्ष्य'

Corona Vaccine : ‘जुलै २०२१ पर्यंत भारतीयांना लस पोहोचवण्याचे लक्ष्य’

Subscribe

जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. याच दरम्यान कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी या प्रश्नाचे उत्तर आजच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले. जुलै २०२१ पर्यंत भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचे लक्ष्य असल्याचे यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोना लशीबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, भारतात ४०० ते ५०० दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. जवळपास २० ते २५ कोटी लोकांपर्यंत जुलै २०२१ पर्यंत ही लस देण्याचे लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे. तसेच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबर अखेरपर्यंत सूचना मागवल्या आहेत, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

ICMR-भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या Covaxin या लशीची सध्या दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे. झायडस कॅडिलाचा ZyCov-D या लशीची सध्या मानवी चाचणी सुरू असून त्याचं परीक्षण नोंदवण्याचं काम सुरू आहे. ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि सीरमने तयार केलेली Covishield या लशीची सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

हेही वाचा –

Indo v/s China : सीमावाद! लडाखमध्ये होणार लष्करी पातळीवर चर्चा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -