घरदेश-विदेशएअर इंडियाची ८४० विमानांची जम्बो खरेदी

एअर इंडियाची ८४० विमानांची जम्बो खरेदी

Subscribe

आणखी ३७० विमाने खरेदी करण्याचा पर्याय खुला

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने दिलेल्या विमान खरेदीच्या ऑर्डरची जगभरात चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात ही ऑर्डर ४७० विमानांची नसून ८४० विमानांची असल्याचे पुढे आले आहे. एअर इंडियाचे मुख्य अधिकारी निपुण अग्रवाल यांनी गुरुवारी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यानुसार एअर इंडियाने विमान उत्पादक कंपनी एअरबस आणि बोईंगला जी ऑर्डर दिली, त्यामध्ये आणखी ३७० विमाने खरेदी करण्याचा पर्याय समाविष्ट आहे. त्यामुळे ही ऑर्डर वाढून ८४० विमानांवर जाते. ही ऑर्डर भारतीय विमान वाहतूक उद्योगासाठी मैलाचा दगड असल्याचे अग्रवाल यांनी नमूद केले आहे.

यासंबंधीचा तपशील देताना अग्रवाल यांनी लिहिले की, ४७० विमाने खरेदी करण्याच्या फर्म ऑर्डरव्यतिरिक्त त्यात पुढील दशकात एअरबस आणि बोईंगकडून आणखी ३७० विमाने खरेदी करण्याचे पर्यायी अधिकारही समाविष्ट आहेत. एअर इंडियाने एअरबस आणि बोईंग या दोन्ही कंपन्यांसोबत केलेले हे करार सुमारे ८० अब्ज अमेरिकी डॉलरचे (६.४० लाख कोटी रुपये) आहेत.

- Advertisement -

एअरबससोबतचा करार सुमारे ४६ अब्ज अमेरिकी डॉलरचा आहे, तर बोईंगसोबतचा करार ३४ अब्ज डॉलरचा आहे. बोईंगकडून आणखी ७० विमाने खरेदी करण्याचा पर्याय असल्याने या कंपनीसोबतचा करार ४५.९ अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच नवीन ३७० विमानांची किंमत किती असेल यावर अद्याप एअर इंडियाकडून माहिती देण्यात आली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -