घरताज्या घडामोडीAligarh Muslim University: देवी-देवतांवर वक्तव्यामुळे अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या प्राध्यापकाचे केलं निलंबन, काय...

Aligarh Muslim University: देवी-देवतांवर वक्तव्यामुळे अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या प्राध्यापकाचे केलं निलंबन, काय आहे प्रकरण?

Subscribe

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ अनेकदा चर्चेमध्ये असते. या विद्यापीठात पुन्हा एकदा नवीन वादाला सुरूवात झाली आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाशी संलग्न जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. जितेंद्र यांना निलंबित करण्यात आले आहे. डॉ जितेंद्र हे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिकल विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.

सहाय्यक प्राध्यापक यांनी हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. बलात्कार या विषयातील संदर्भात अभ्यास करतावेळी, देवी-देवतांबद्दल अत्यंत चुकीचं वक्तव्य किंवा टीका केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी उमर पीरजादा यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण ?

सहाय्यक प्राध्यापक डॉ. जितेंद्र MBBSचं शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांना बलात्काराविषयी प्रोजेक्टरवर शिकवत होते. प्रोजेक्टरवर देवी- देवतांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या होत्या. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टरवर लिहिलेल्या आक्षेपार्ह गोष्टींचे फोटो काढून व्हायरल केले. त्यानंतर हिंदू संघटनांनी विरोध करण्यास सुरूवात केला. या प्रकरणी विद्यापीठाने प्राध्यापकाला नोटीस दिल्यानंतर प्राध्यापकांनी माफी मागितली आहे.

- Advertisement -

दरम्यान, हे प्रकरण अधिकच वाढत असताना अलीगढ मुस्लिम विद्यापीठाने या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात केली आहे. आता दोन सदस्यीय पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी दोन वरिष्ठ प्राध्यापकांकडे सोपवण्यात आली आहे.


हेही वाचा : Twitterवरून पराग अग्रवाल यांना डच्चू मिळण्याची शक्यता?, एलन मस्कच्या एन्ट्रीनंतर युझर्सकडून वादाचे संकेत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -