घरदेश-विदेशकेंद्रीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर राऊतांचं बोट, केंद्राकडून कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा राज्यसभेत आरोप

केंद्रीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर राऊतांचं बोट, केंद्राकडून कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा राज्यसभेत आरोप

Subscribe

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्राकडून कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप राज्यसभेत बोलताना केला. याशिवाय, केंद्रीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर देखील बोट ठेवलं. फौजदारी प्रक्रिया ओळख विधेयकावर बुधवारी राज्यसभेत चर्चा सुरु होती. यावर चर्चा करताना संजय राऊत यांनी हा आरोप केला आहे.

संजय राऊत म्हणाले, “या विधेयकात सामान्य व्यक्ती आणि गुन्हेगारी यात फरक नाही आहे असं म्हटलं आहे. आम्हाला पण या विधेयकाची भिती वाटतेय की येणाऱ्या दिवसात काय होईल आणि काय नाही हे आता हळूहळू कळायला लागलं आहे. अपराधी कोण आहे? जो तुमच्यावर प्रश्न उपस्थित करेल त्याला तुम्ही गुन्हेगार समजत आहात. इथे या बाजुला बसलेला प्रत्येक व्यक्ती तुम्हाला गुन्हेगार वाटत आहे. नव्या कायद्याने यंत्रणांना ताकद मिळेल, पण किती? तुम्ही पोलिसांना राक्षस बनवायला जात आहात, सैतान बनवायला जात आहात. त्याच्यापेक्षा तुम्ही मार्शल लॉच लावा,” असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“या कायद्याचा गैरवापर होणार नाही असं तुम्ही आश्वासन देत आहात. तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून सांगाल का या कायद्याचा दुरुपयोग होणार नाही. कायद्याचा दुरुपयोग होत नाही आहे का?” असा आरोप संजय राऊत यांनी राज्यसभेत केला.

पवारांनी राऊतांवरच्या कारवाईवरचा मुद्दा मोदींसमोर मांडला

शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीनंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदींसोबत काय चर्चा केली यासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावर ते माहिती देताना म्हणाले की, “संजय राऊत राज्यसभेचे माझी सहकारी, सामनाचे संपादक त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. त्यांचं फ्लॅट आणि अर्धा एकर जमीन जप्त केली आहे. हा अन्याय आहे. राज्यसभा सदस्य आणि जेष्ठ पत्रकार असल्याने मी ही गोष्ट पंतप्रधान मोदींच्या कानावर टाकली,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar-Narendra Modi : शरद पवारांनी संजय राऊतांवरच्या कारवाईवरचा मुद्दा मोदींसमोर मांडला


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -