घरCORONA UPDATEब्रिटनमधून येणाऱ्यांना १० दिवस व्हावे लागणार क्वारंटाइन, भारताचे जशास तसे उत्तर

ब्रिटनमधून येणाऱ्यांना १० दिवस व्हावे लागणार क्वारंटाइन, भारताचे जशास तसे उत्तर

Subscribe

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना आता अनेक देशांकडून नवीन नियमावली जाहीर केली जात आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटन सरकारने भारतीय प्रवाशांना विमान प्रवासासाठी काही नवे नियम जाहीर केले होते. या नियमांनुसार, कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या भारतीय नागरिकांनाही १० दिवस क्वारंटाइन राहावे लागणार असे जाहीर केले होते. त्यामुळे ब्रिटनच्या निर्णयावर भारतीय नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच ब्रिटनमधून येणाऱ्या नागरिकांनाही आता १० दिवस क्वारंटाइन व्हावे लागणार असा निर्णय भारत सरकारने जाहीर केला आहे. या निर्णयातून भारत सरकारने ब्रिटन सरकारला जशास तसे उत्तर दिले आहे. भारत सरकारने ब्रिटनहून भारतात येणाऱ्या ब्रिटन नागरिकांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचना ४ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

त्यामुळे ४ ऑक्टोबरपासून ब्रिटनहून भारतात पोहचणाऱ्या नागरिकांना वॅक्सिनेशन रिपोर्ट दाखवण्याबरोबरचं काही अनेक निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. तसेच यूकेहून भारतात येण्याआधी ७२ तासांपर्यंत आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. भारतात पोहचल्यानंतरही नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. याशिवाय भारतात पोहोचल्यानंतर आठ दिवसांनी ही चाचणी केली जाईल. यासह किमान दहा दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक असेल. म्हणजेच ब्रिटनहून भारतात आल्यानंतर नागरिकांना पुढील दहा दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.

- Advertisement -

ब्रिटिश सरकारने भारतीय लसीला मान्यता न दिल्यानंतर भारत सरकारने ही कडवी भूमिका घेतली आहे. भारताच्या कठोर निर्णयानंतर ब्रिटनने भारताच्या कोरोना लसीला मंजूर दिली, परंतु त्याचबरोबर असेही म्हटले होते की, भारतातून ब्रिटनमध्ये आल्यावर भारतीय नागरिकांना लस घेऊनही क्वारंटाइन राहणे बंधनकारक आहे. ब्रिटन सरकारच्या या निर्णयावर भारतीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ब्रिटनने एप्रिल महिन्यात भारतातून येणाऱ्या प्रवाशांसाठी “रेड लिस्ट” कोविड -19 प्रवास बंदी लागू केली होती. या निर्बंधांनुसार, भारतातून यूकेमध्ये येण्यास मनाई करण्यात आली होती. याशिवाय नवी दिल्लीहून आपल्या देशात परतणाऱ्या ब्रिटिश आणि आयरिश नागरिकांना दहा दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाइन राहणे गरजेचे होते. यानंतर भारताने कडवट भूमिका घेताच ब्रिटन सरकारने विमान प्रवासावरील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली, तसेच भारताला रेड लिस्टमधून काढून टाकले.

- Advertisement -

या अंतर्गत आता लसीकरण पूर्ण झालेले भारतीय प्रवासी ब्रिटनमध्ये पोहचताच दहा दिवस त्यांच्या घरी किंवा पसंतीच्या कोणत्याही ठिकाणी क्वारंटाईन राहू शकतील. याशिवाय, प्रवाशांना भारत रवाना होण्यापूर्वी तीन दिवस आधी कोरोनाची चाचणी घ्यावी लागेल. तसेच, ब्रिटनला पोहोचल्यावर दोन चाचण्या ( पहिली पोहचल्य़ानंतर दुसऱ्या दिवशी आणि दुसरी आठव्या दिवशी) करावी लागेल. आता भारताने या निर्णयाला प्रत्युत्तर दिले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -