घरताज्या घडामोडीMoney Laundering Case: अनिल देशमुख यांना चीफ मेट्रोपोलिटन कोर्टाने जारी केला समन्स

Money Laundering Case: अनिल देशमुख यांना चीफ मेट्रोपोलिटन कोर्टाने जारी केला समन्स

Subscribe

मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात चीफ मेट्रोपोलिटन कोर्टाने समन्स बजावला आहे. अनिल देशमुख यांना ईडीने पाच समन्स पाठवूनही ते अद्याप चौकशीसाठी हजर राहिले नाही आहेत. त्यामुळे कोर्टाने अनिल देशमुखांविरोधात कारवाई करावी अशी ईडीने मागणी केली होती. त्यानुसार कोर्टाने देशमुख यांच्या विरोधात समन्स बजावला आहे. (Chief Metropolitan Court summons anil deshmukh)

आतापर्यंत अनिल देशमुख यांना पाठविण्यात आलेल्या समन्स पैकी एक समन्स स्वतः देशमुखांनी स्वीकार केला तर उर्वरित समन्स त्यांच्या वकील आणि कुटुंबियांनी स्वीकारले. समन्स स्वीकार करूनही अनिल देशमुख हे अजूनपर्यंत ईडी समोर हजर राहिले नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणात देशमुखांविरोधात चीफ मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट कोर्टाने समन्स जारी केला आहे.

- Advertisement -

काल, गुरुवारी अनिल देशमुख यांच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी सीबीआयने राज्यातील दोन प्रमुख अधिकाऱ्यांना समन्स बजावला होता. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयकडून समन्स बजावण्यात आला. पण या दोन्ही अधिकाऱ्यांनी सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी उपस्थितीत राहण्यास नकार दिला आणि काही माहिती हवी असेल तर सीबीआयने त्यांच्याकडे यावे, असे म्हटले होते.


हेही वाचा – परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -