घरदेश-विदेशमसूदच्या सुटकेचा निर्णय काँग्रेसलाही मान्य होता - अमित शाह

मसूदच्या सुटकेचा निर्णय काँग्रेसलाही मान्य होता – अमित शाह

Subscribe

'मसूद अझहरची सुटका का केली? हा प्रश्न उपस्थित करुन, दुर्देवाने राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत,' असं अमित शाह यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

‘दहशतवादी मसूद अझहर याची सुटका नक्की कुणी केली होती, मोदी याचं उत्तर द्या? अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्यंतरी केली होती. दरम्यान, याच मुद्द्यावरुन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या ब्लॉगमधून राहुल यांनी काही गोष्टींची आठवण करुन दिली आहे. अमित शाह यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे. शाह त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हणतात की, ‘१९९९ मध्ये विमान अपहरणाच्या घटनेनंतर तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्व पक्षांची बैठक बोलावली होती. या सर्वपक्षीय बौठकीला सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग हेदेखील हजर होते. तेव्हा देशावासीयांच्या असलेल्या भावना ओळखून भावनेचा मसूद अझहरची सुटका करण्याचा आणि प्रवाशांना सुखरुप परत आणण्याचा निर्णय सर्व पक्षांनी मिळून घेतला होता. त्यावेळी देशाकडे अन्य कुठला पर्यायही नव्हता.’


वाचा: ‘मसूद अझहरला कुणी सोडले, मोदींनी उत्तर द्यावे’

अमित शाह पुढे लिहीतात की, ‘विमान पळवणाऱ्यांवनी ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची होती आणि सरकारच्या निर्णयाला सर्व पक्षांची सहमती होती.’ ‘त्यामुळे मसूद अझहरची सुटका का केली ? हा प्रश्न उपस्थित करुन, दुर्देवाने राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत,’ असंही शाह यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. ‘त्यावेळी सुटका करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी शाहीद लतीफ हा दहशतदी पठाणकोट हल्ल्यात सहभागी होता, असा दावाही अमित शाह यांनी केला. कंदहार विमान अपहरणाला राजकीय मुद्दा बनवायचं जर राहुल गांधी यांनी ठरवलं असेल, तर त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी दोनच्या कार्यकाळात २०१० साली २५ दहशतवाद्यांची मुक्तता करण्यात आली त्याबद्दलही बोलावे’, असंही अमित शाह यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -