घरदेश-विदेशराहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र?, पवारांचं नाव त्याचाच भाग?

राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र?, पवारांचं नाव त्याचाच भाग?

Subscribe

काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट, संजय निरुपम यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना UPA च्या अध्यक्षपदी नेमणूक करणार असल्याच्या चर्चा गुरुवारी होत्या. यानंतर स्वत: शरद पवार यांनी या वृत्तांचे खंडन केले. मात्र, शरद पवार यांना UPA चा अध्यक्ष बनवण्यासंर्भात सुरु असलेली चर्चा ही काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींविरोधात पक्षांतर्गत सुरु असलेल्या अभियानाचा भाग असल्याचा मोठा आरोप काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे. शिवाय, काँग्रेसला संपवण्यासाठी मोठा कट रचला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. संजय निरुपम यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहीत राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी राहुल गांधींमध्ये सातत्याचा अभाव असल्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून संजय निरुपम यांनी थोडीशी फारकत घेतली आहे. त्यात आता शरद पवारांना UPA चा अध्यक्ष बनवण्यासंर्भात सुरु असलेली चर्चेवरुन मोठा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. “दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधी यांच्या विरोधात जे अभियान सुरु आहे त्याचाच भाग म्हणजे पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या चर्चा,” असं खळबळ उडवून देणारे ट्विट निरुपम यांनी केले आहे. याच अभियानाच्या अंतर्गत २३ सह्यांचे पत्र लिहिले गेले होते, असेही निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. वारंवार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यामधल्या उणीवा दाखवण्याचे काम एक ठराविक वर्ग करतो आहे. काँग्रेस मिटवण्याचा एक मोठा प्लॅन चालू आहे, असं मोठे विधान आपल्या ट्विटमधून संजय निरुपम यांनी केले आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल केला जावा किंवा खांदेपालट व्हावी, म्हणून काँग्रेसच्या २३ नेत्यांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना ऑगस्ट महिन्यात सविस्तर पत्र लिहिले होते. काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाची आवश्यकता असल्याचे त्यांनी या पत्रामध्ये म्हटले होते. एकप्रकारे काँग्रेसमधील अशी नावे ज्यांना गांधी घराण्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या तरी हातात पक्षाची सुत्रे जावी वाटतात, अशा नेत्यांनीच शरद पवार यांच्या यूपीएचे अध्यक्षपदाच्या चर्चा घडवल्या, असाच निरुपम यांच्या म्हणण्याचा मतितार्थ होतो.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -